एक्स्प्लोर

ठाण्यातले ट्री मॅन विजय कुमार कुट्टी! घरात तब्बल 275 रोपट्यांची जोपासना

ठाण्यातील बाळकुम येथे राहणारे निसर्गप्रेमी आणि पर्यावरण संरक्षणासाठी काम करणारे विजय कुमार कुट्टी यांनी आपल्या घरातच सुंदर बाग तयार केली आहे. त्यांच्या बेडरूममध्ये तब्बल 275 प्रकारची विविध झाडे त्यांनी लावली आहेत.

ठाणे : आजपर्यंत आपण अनेक वृक्षप्रेमी पाहिले असतील. ज्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी झाडं लावून आपलं वृक्ष प्रेम व्यक्त केलं आहे. मात्र ठाण्यात एक अवलिया असे आहेत ज्यांनी आपल्या बेडरूममध्ये आपल्या आवडत्या झाडांना जागा दिली आहे. त्यांच्या या छंदामुळे ठाण्यातले लोक त्यांना ठाण्याचा ट्री मॅन असे म्हणू लागले आहेत.

ठाण्यातील बाळकुम येथे राहणारे निसर्गप्रेमी आणि पर्यावरण संरक्षणासाठी काम करणारे विजय कुमार कुट्टी यांनी आपल्या घरातच सुंदर बाग तयार केली आहे. त्यांच्या बेडरूममध्ये तब्बल 275 प्रकारची विविध झाडे त्यांनी लावली आहेत. तर त्यांच्या घराला असलेल्या बाल्कनीमध्ये एक किचन गार्डन तयार करून त्यात देखील 30 ते 40 फळभाज्या पालेभाज्या त्यांनी वाढवल्या आहेत. यापैकी अनेक झाडे त्यांनी रस्त्यावर पडलेल्या झाडांच्या फांद्या पासून वाढवली आहे. अनेक जण झाड मरून गेले म्हणून ते फेकून देतात, पण विजय कुमार अशीच झाडे घरी आणतात आणि त्यांना पुनर्जीवन देतात.

अठरा महिन्यांपूर्वी त्यांनी पहिल्यांदा एक झाड आणले होते. मात्र काही कारणास्तव ते झाड जगू शकले नाही. त्यामुळे त्यांची जिज्ञासा वाढली आणि त्यांनी झाडांबद्दल माहिती गोळा करत ती माहिती प्रत्यक्षात अमलात आणून घरच्या घरीच अनेक झाडं लावली. विजय कुमार यांना आता कोणत्या झाडाला किती माती लागते, कोणत्या झाडाला किती पाणी लागते, कोणते झाड कोणत्या परिस्थितीत जगू शकते अशा सर्व विषयांची माहिती आहे. तसेच झाडे जगवण्यासाठी जापनीज तंत्रज्ञानाचा वापर देखील ते आता करू शकतात. त्याचप्रमाणे घरात झाडे लावायची असतील तर त्यासाठी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी या सर्व गोष्टींचे ज्ञान प्राप्त झाले आहे. त्यांना ओळखणारे लोक आता ठाण्याचे ट्रीमॅन म्हणून त्यांना बोलू लागले आहेत.

फक्त झाडांमुळे विजयकुमार यांची ओळख नसून त्यांच्या विविध सामाजिक कार्यामुळे देखील त्यांना समाजात ओळखतात. विजयकुमार छंद म्हणून घरात झाडे लावत असले तरी ते एक बायोमेडिकल इंजिनियर आहेत. त्यांनी अनेक वर्षे टाटा हॉस्पिटल मध्ये देखील काम केले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nanded News : डॉक्टर होण्याचं स्वप्न...पण मुंबईच्या रस्त्यावर भीक मागण्याची वेळ; दीड महिन्यांपासून बेपत्ता विद्यार्थ्याची हृदयद्रावक कहाणी!
डॉक्टर होण्याचं स्वप्न...पण मुंबईच्या रस्त्यावर भीक मागण्याची वेळ; दीड महिन्यांपासून बेपत्ता विद्यार्थ्याची हृदयद्रावक कहाणी!
Petrol Diesel Price Hike: महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ, आता किती दर वाढले?
Petrol Diesel Price Hike: महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ, आता किती दर वाढले?
Ladki Bahin Yojana : ...पैशांची कमतरता असेल लाडकी बहीण योजना बंद करा, शेतकऱ्यांना भरभरुन पैसे द्या, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी
...पैशांची कमतरता असेल लाडकी बहीण योजना बंद करा, शेतकऱ्यांना भरभरुन पैसे द्या, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी
ढग आले दाटून, पाऊस आला धावून! तापमानात वाढ होत असताना राज्यात पावसाची हजेरी, उकाड्यापासून दिलासा
ढग आले दाटून, पाऊस आला धावून! तापमानात वाढ होत असताना राज्यात पावसाची हजेरी, उकाड्यापासून दिलासा

व्हिडीओ

Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Fuel Shortage Special Report : डिझेलसाठी रात्रभर रांगा, एक कॅन डिझेलसाठी कुठे राडा कुठे दंगा
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime news: रत्नागिरीत तरुणावर कोयत्याने सपासप वार, रक्ताच्या थारोळ्यात पडला, जीव सोडता सोडता मारेकऱ्यांची नावं सांगितली, म्हणाला...
रत्नागिरीत तरुणावर कोयत्याने सपासप वार, रक्ताच्या थारोळ्यात पडला, जीव सोडता सोडता मारेकऱ्यांची नावं सांगितली, म्हणाला...
Maharashtra Live blog updates: कोकणातील महामार्ग सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, अनेक घाटांवर दरडी कोसळण्याचा गंभीर धोका; केंद्राच्या तज्ज्ञ पथकाला पाचारण!
Maharashtra Live blog updates: कोकणातील महामार्ग सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, अनेक घाटांवर दरडी कोसळण्याचा गंभीर धोका; केंद्राच्या तज्ज्ञ पथकाला पाचारण!
Abhijeet Dipake : मोठी बातमी, अभिजीत दीपकेचं इन्स्टाग्राम खातं हॅक, कॉकरोच जनता पार्टीचं इन्स्टावरील बॅकअप अकाऊंट हटवलं
अभिजीत दीपकेचं इन्स्टाग्राम खातं हॅक, कॉकरोच जनता पार्टीचं इन्स्टावरील बॅकअप अकाऊंट हटवलं
NEET पेपरफुटीचे महाराष्ट्र केंद्र, 11 पैकी सात आरोपी राज्यातील, अजून एक CBIच्या वेटिंग लिस्टवर
NEET पेपरफुटीचे महाराष्ट्र केंद्र, 11 पैकी सात आरोपी राज्यातील, अजून एक CBIच्या वेटिंग लिस्टवर
Ladki Bahin Yojana : ...पैशांची कमतरता असेल लाडकी बहीण योजना बंद करा, शेतकऱ्यांना भरभरुन पैसे द्या, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी
...पैशांची कमतरता असेल लाडकी बहीण योजना बंद करा, शेतकऱ्यांना भरभरुन पैसे द्या, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी
RBI कडून केंद्र सरकारच्या तिजोरीत 2.86 लाख कोटी रुपयांचा लाभांश जमा,आरबीआयच्या सेंट्रल बोर्डाचा मोठा निर्णय
RBI कडून केंद्र सरकारच्या तिजोरीत 2.86 लाख कोटी रुपयांचा लाभांश जमा, सरकारला संकटकाळात दिलासा
NEET UG Paper Leak :  नीट यूजी परीक्षेचा पेपर लीक होताच लातूरमध्ये साफसफाई सुरु, उद्योग भवनातील क्लासेस, हॉस्टेल बंद करण्याचे आदेश  
 लातूरच्या ट्युशन एरियावर प्रशासनाचा दणका, उद्योग भवन मधील क्लासेस, हॉस्टेल तात्काळ बंद करण्याचे आदेश
Petrol Diesel Price Hike: महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ, आता किती दर वाढले?
Petrol Diesel Price Hike: महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ, आता किती दर वाढले?
Embed widget