Mumbai Local News : मुंबईत हार्बर रेल्वे (Mumbai Harbour Railway) मार्गावर प्रवाशांची तारांबळ झाली आहे. कोपरखैरणे स्टेशनजवळ OHE वायर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते नेरूळ सेक्शन मधील गाड्या सध्या बंद आहेत. दुपारी 12:40 पासून गाड्या बंद आहेत. झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी रेल्वेकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत.
हार्बर रेल्वे मार्गावरुन दररोज अनेक लोक प्रवास करतात. मात्र, कामाला जाण्याच्या वेळी, तसेच कामासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना अचानक झालेल्या वाहतूक बिघाडामुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या संदर्भात मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार (Shivaji Sutar) यांनी ट्वीट केले आहे.
दरम्यान, ट्रान्स हार्बर मार्गावर लोकल वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. वीजपुरवठा खंडीत झाल्याने घणसोली स्थानकात तात्पुरती लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच, ठाणे-वाशी आणि वाशी-ठाणे मार्गाने ये-जा करणाऱ्या लोकल वाहतूक सेवासुद्धा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Traffic Police : विरुद्ध दिशेने आल्याने अडवलं, कार चालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेलं
- Trending Traffic Police : ट्रॅफिक पोलिसांच्या डान्सपुढे भले-भले फेल! भररस्त्यात मायकल जॅक्सनच्या गाण्यावर केला जबरदस्त डान्स
- Pune : गाडीची कागदपत्रं क्लिअर पण पत्त्यांचा कॅट सापडला म्हणून तरुणांना अडवलं, नियम विचारताच पोलिसाची तारांबळ