Bakri Eid 2022 : सालाबादप्रमाणे यंदाही बकरी ईद रविवारी जुलाई 10 ला साजरी केली जाणार आहे. या निमित्त देवनारच्या पशुवादगृह येते बकरा मंडी भरली आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विविध राज्यातून एक लाखांहून अधिक बकरे या मंडीत विक्रीसाठी आणण्यात आले आहेत. पाच हजारांपासून लाखो रुपयांपर्यंतचे बोकड मंडीत बघायला मिळातात. मंडीत होणाऱ्या गर्दीचा फायदा उचलत काही चोरटे बकऱ्या चोरून नेण्याचा प्रयत्न करत होते. पण बकऱ्या चोरीचे प्रकार यावेळी घडू नये याकरता मुंबई महानगर पालिका पशुवाद गृह आणि देवनार पोलिसांनी यंदा विशेष काळजी घेतली आहे.


मंडीत दाखल होणाऱ्या तसेच विकल्या जाणाऱ्या शिवाय शिल्लक असलेल्या बकऱ्यांची बारकोडच्या सहाय्यानं नोंदणी केली जात आहे. बारकोड सिस्टमचा वापर केला जात असला तरी अन्य खबरदारी देखील पोलीस घेत आहेत. प्रत्येक गेटवर साध्या वेशातील पोलिसांची करडी नजर असून खबऱ्यांचं जाळं देखील पसरवलं आहे. याव्यतिरिक्त सीसीटिव्हीतून देखील मंडीतील प्रत्येक घडामोडीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे. परराज्यातून बकऱ्या विकायला आलेल्या व्यापाऱ्यांची फसवणूक होऊ नये, याची देखील काळजी घेतली जात आहे. 


परराज्यातील व्यापाऱ्यांची विशेष काळजी


परराज्यातून बकऱ्या विकायला आलेल्या व्यापाऱ्यांची फसवणूक होऊ नये, याची देखील काळजी घेतली यावेळी घेतली जात आहे. त्यामुळे बाजारात येणाऱ्या प्रत्येक व्यापाऱ्याचा फोटो स्कॅन करून आणि त्याला बारकोड देऊनच आत प्रवेश दिला जात आहे. शिवाय बकऱ्या विकत घेणाऱ्यास गेटवर खरेदी पावती आणि बारकोड दाखवूनच बकऱ्यांना गेट बाहेर सोडले जात आहे.    


7 लाखांचा बोकड 


सात लाखाचं बोकड शराफतअली गोरी हा व्यापारी गुजरात राज्यतून मुंबई देवनार मंडित विकण्यासाठी घेऊन आला. त्याची किंमत 7 लाख रुपये जाहीर करण्यात आली आहे. शराफत म्हणतात बकऱ्याच्या शरीरावर उर्दूमध्ये अल्लाह शब्द आहेत. ते जन्मापासूनच आहे आणि म्हणून त्याची एवढी मोठी किंमत ठेवली आहे. ज्यावेळी त्यांना शेवटच्या दोन दिवसांत बोकड विकला जाईल का? असं विचारलं त्यावेळी मुंबईतील बाजारपेठ केवळ दोन दिवसांची असते, त्यामुळे बोकड नक्की विकला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.