एक्स्प्लोर
साहेबांची गाडी ओळखायची कशी? ट्राफिक पोलिसांची पंचाईत
![साहेबांची गाडी ओळखायची कशी? ट्राफिक पोलिसांची पंचाईत Traffic Police In Dilemma As Beacons Removed From Vips Cars साहेबांची गाडी ओळखायची कशी? ट्राफिक पोलिसांची पंचाईत](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/03084646/Beacon-Car.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
प्रातिनिधीक फोटो
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशानुसार राज्यातील व्हीव्हीआयपींनी आपली ओळख असलेला गाडीवरचा दिवे उतरवला. मात्र त्यामुळे हायकोर्टाच्या परिसरातील ट्राफिक पोलिसांची चांगलीच पंचाईत झाली आहे. साहेबांची गाडी ओळखायची कशी, हा प्रश्नच वाहतूक पोलिसांसमोर उभा राहिला.
पंतप्रधानांच्या आदेशानंतर मुख्यमंत्र्यांपासून विविध मंत्र्यांनी तातडीने आपापल्या कारवरील दिवे उतरवले. याला मुंबई उच्च न्यायालयही अपवाद नाही. हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या लाल दिव्यासह इतर सर्व न्यायमूर्ती, तसंच महाधिवक्ता, अॅडिशनल सॉलिसिटर जनरल, रजिस्ट्रार या सर्वांनीही आपल्या गाडीवरील भगवे दिवे उतरवून ठेवले.
मात्र त्यामुळे हायकोर्टाच्या परिसरातील ट्राफिक पोलिसांची चांगलीच पंचाईत झाली. सोमवारी हायकोर्टाबाहेर एका वरिष्ठ न्यायमूर्तींची उभी असलेली गाडी काढण्याचा इशारा एका कर्तव्यदक्ष ट्राफिक हवालदारानं ड्रायव्हरला केला. मात्र ही साहोबांची गाडी आहे, हे समजताच बिचारा करतो काय? आल्या पावली परत गेला.
वर्षानुवर्ष हायकोर्टाबाहेर ऐटीत उभी राहणारी गाडी आता रस्त्यांवरील सर्वसामान्य गाड्यांप्रमाणे दिसू लागली आहे. त्यात आपल्या कर्तव्यदक्ष ट्राफिक पोलिसांची काय चूक. मुख्य न्यायमूर्तींचा लाल दिवा गेला तरी त्यांच्या गाड्यांचा ताफा त्यांची ओळख सांगण्यास पुरेसा असतो. अपवाद आहे तो हायकोर्टातील इतर साहेबांचा. तेव्हा आता साहेबांची गाडी ओळखायची कशी? असा प्रश्न ट्राफिक पोलिसांना पडला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)