एक्स्प्लोर

प्रवाशाने लाथ मारल्याने डोकं आपटून ट्रॅक टेक्निशियनचा मृत्यू

चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधील एका टवाळ प्रवाशाने ट्रॅक टेक्निशियन श्रवण सानप यांना लाथ मारली. त्यामुळे पडून डोकं आपटल्याने त्यांचा मृत्यू झाला.

मुंबई : लोकलमधील प्रवाशाने लाथ मारल्यामुळे रेल्वे रुळांची देखभाल करणाऱ्या ट्रॅक टेक्निशियनला जीव गमवावा लागला. मुंबईतील पश्चिम रेल्वेवर महालक्ष्मी आणि लोअर परेल स्थानकादरम्यान बुधवारी सकाळी हा दुर्दैवी प्रकार घडला. 47 वर्षीय श्रवण सानप आठ सहकाऱ्यांसोबत ड्युटीवर होते. त्यावेळी चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधील एका टवाळ प्रवाशाने सानप यांना लाथ मारली. त्यामुळे पडून डोकं आपटल्याने सानप यांचा मृत्यू झाला. 'दुरुस्ती होत असलेल्या रुळांजवळ ट्रेन पोहचत असल्याचं दिसताच पर्यवेक्षकाने शिटी वाजवली. शिटी ऐकून सावध झालेले सहा कर्मचारी ट्रेनच्या एका बाजूला गेले, तर सानप आणि नामदेव आव्हाड नावाचा सहकारी दुसऱ्या बाजूला' असं पश्चिम रेल्वेवरील अधिकाऱ्याने सांगितलं. 'लाथ बसल्यामुळे सानप यांचा तोल गेला आणि त्यांचं डोकं ट्रेनच्या फूटबोर्डखाली असलेल्या इमर्जन्सी स्टेप्सवर आदळलं.' अशी माहिती सानप यांचे सहकारी नामदेव आव्हाड यांनी दिली. सानप यांना तात्काळ महालक्ष्मी स्थानकावर नेण्यात आलं. तिथे 108 क्रमांकाची अॅम्ब्युलन्स पार्क होती, मात्र चालक किंवा डॉक्टर नव्हता. त्यामुळे सानप यांना मुंबई सेंट्रलमधील नायर रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आलं. जीआरपीने आपला जबाब नोंदवण्यास नकार दिल्याचा दावा आव्हाड यांनी केला. 'जीआरपीला फक्त मोटरमनचा जबाब हवा होता. मात्र ट्रेनच्या समोर घडणाऱ्या अपघातांविषयीच मोटरमनला माहिती असते. सानप हे अपघातावेळी मोटरमनच्या तीन कोच मागे होते.' असं नामदेव आव्हाड यांनी सांगितलं. पश्चिम रेल्वे टवाळ प्रवाशाला शोधण्यासाठी सीसीटीव्ही फूटेज तपासणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Weather News: मुंबईत मुसळधार, पालघरमध्ये हाहाकार; डहाणू-विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प; पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
मुंबईत मुसळधार, पालघरमध्ये हाहाकार; डहाणू-विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प; पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
अजितदादांच्या आयुष्यातही मुख्यमंत्री बनण्याची संधी आली होती पण... वळसे पाटलांनी दिला अजितदादांच्या आठवणींना उजाळा
अजितदादांच्या आयुष्यातही मुख्यमंत्री बनण्याची संधी आली होती पण... वळसे पाटलांनी दिला अजितदादांच्या आठवणींना उजाळा
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
नीट पेपरफुटी, ठाकरे बंधूंकडून मोर्चात एकत्र येण्याची तयारी; दुसरीकडे दंगलफेम अभिनेत्री आयशा खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं
नीट पेपरफुटी, ठाकरे बंधूंकडून मोर्चात एकत्र येण्याची तयारी; दुसरीकडे दंगलफेम अभिनेत्री आयशा खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget