LIVE UPDATES | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'तान्हाजी' चित्रपट पाहण्यासाठी दादरच्या प्लाझा चित्रपटगृहात

Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात शस्त्र बाळगण्यास आणि जमाव बंदी लागू, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाचा निर्णय
2. पाथरी-साईंचं जन्मस्थळ उल्लेख मुख्यमंत्र्यांकडून मागे, बैठकीनंतर शिर्डीचे खासदार लोखंडेंचा दावा, मात्र पाथरीकरांना दावा अमान्य, आज सर्वपक्षीय बैठक
3. 2014 मध्ये सत्तास्थापनेसाठी सेनेचा काँग्रेसला प्रस्ताव, पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा, तर शिवसेनेचा खरा चेहरा समोर आल्याची भाजपची बोचरी टीका
4. महाविकासआघाडी सरकारची शेतकरी कर्जमाफीची योजना फसवी आणि तकलादू, राजू शेट्टींचा सरकारला घरचा आहेर, बळीराजाच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा
5. 26 ते 28 जानेवारीदरम्यान मुंबईत पारा घसरणार, हवामान विभागाचा अंदाज, तापमान 14 अंशांच्या खाली जाण्याची शक्यता
6. इराण-अमेरिकेत संघर्ष सुरुच, इराकच्या ग्रीन झोनमध्ये पुन्हा रॉकेट हल्ला, अमेरिकेच्या दूतावासाजवळ तीन रॉकेट्सचा मारा
एबीपी माझा वेब टीम























