एक्स्प्लोर

संपूर्ण घटनाक्रम : ... आणि प्रसाद लाड यांच्या नावाची घोषणा झाली!

रात्री 9.30 वाजता पहिली बैठक झाली, मग रात्री-मध्यरात्री आणखी काही बैठका पार पडल्या आणि सकाळी प्रसाद लाड यांच्या नावाची घोषणा झाली.

मुंबई : विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून प्रसाद लाड यांच्या नावाची घोषणा झाली आहे. मात्र प्रसाद लाड यांचं नाव निश्चित करण्यासाठी मध्यरात्री बैठकांचं सत्र सुरु होतं. अतिशय वेगवान हालचाली झाल्या. रात्री 9.30 वाजता पहिली बैठक झाली, मग रात्री-मध्यरात्री आणखी काही बैठका पार पडल्या आणि सकाळी प्रसाद लाड यांच्या नावाची घोषणा झाली. रात्री-मध्यरात्री झालेल्या बैठकींचं सत्र अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण प्रत्येक बैठकीला मोठा अर्थ आहे. पाहूया कुणा-कुणामध्ये किती वाजता बैठक झाल्या : वेळ : रात्री 9 वाजता : विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या रेसमधून आऊट झालेले नारायण राणे यांनी ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तब्बल 2 तास दोघांमध्ये चर्चा झाली. राणे वेळ : रात्री 11.10 वाजता : नारायण राणे ‘वर्षा’ बंगल्यावरुन बाहेर पडले. या बैठकीत राणेंची समजूत काढण्यात मुख्यमंत्र्यांना यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र येत्या जुलैमध्ये होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत राणेंना उमेदवारी देण्याची शाश्वती मिळाली असल्याचं म्हटलं जात आहे. वेळ : रात्री 11.20 वाजता : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार म्हणून प्रसाद लाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. वेळ : रात्री 1 वाजता : प्रसाद लाड यांनी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेनेनं प्रसाद लाड यांना पाठिंबा जाहीर केला. वेळ : रात्री 2 वाजता : उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर प्रसाद लाड यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांकडे उद्धव ठाकरेंचा पाठिंब्याचा निरोप घेऊन ‘वर्षा’वर पोहचले. तिघांच्या बैठकीत शिवसेना आणि भाजपमध्ये लेखी सांमंजस्य करार झाला. यावर सही करण्यासाठी शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांनाही पहाटे 4 वाजता ‘वर्षा’वर बोलवण्यात आलं. वेळ : सकाळी 7 वाजता : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी प्रसाद लाड यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. संबंधित भाजप पदाधिकाऱ्यांना सकाळी 11 वाजता अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहण्याचे निरोप धाडण्यात आले. भाजपमध्ये नाराजीचा सूर  या पोटनिवडणुकीसाठी माधव भांडारी, शायना एनसी अशी पक्षातील निष्ठावंतांची नावं आघाडीवर असताना पुन्हा एकदा राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या प्रसाद लाड यांनी बाजी मारली. यामुळे भाजपात नाराजीचा सूर उमटत असल्याची चर्चा आहे. तर शेतकरी आणि सर्वसमन्यांच्या हिताचं निमित्त करुन रोज एकमेकांवर टीकेची झोड उठवणारे दोन मित्रपक्ष सत्तेच्या बेरजेसाठी पुन्हा गळ्यात गळे घालताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको. संबंधित बातम्या : विधानपरिषद पोटनिवडणूक : राणेंचा पत्ता कट, प्रसाद लाड यांना उमेदवारी विधानपरिषद पोटनिवडणूक : प्रसाद लाड यांची कारकीर्द
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Andheri Subway Mumbai Rain: अंधेरी सब-वेसाठी आता 'आदित्य पॅटर्न'; अमित साटमांच्या पुढाकाराने 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव
अंधेरी सब-वेसाठी आता 'आदित्य पॅटर्न'; अमित साटमांच्या पुढाकाराने 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव
मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन
मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?
शेतकरी कर्जमाफीत जाचक अटी, सरकारी नोकदारांना 25 हजारांपर्यंत पगार मर्यादा; शेतकरी संघटना अन् विरोधकांचा संताप
शेतकरी कर्जमाफीत जाचक अटी, सरकारी नोकदारांना 25 हजारांपर्यंत पगार मर्यादा; शेतकरी संघटना अन् विरोधकांचा संताप

व्हिडीओ

WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं
Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SEBI : एका तक्रारीनं 15 लाख कोटींचा अपहार उघड, सेबीचा राजेश एक्सपोर्टसला दणका,सर्वात मोठ्या सोन्याच्या रिफायनरीचा मालक संकटात, शेअर बाजारात ट्रेडिंगला बंदी
सेबीचा राजेश एक्सपोर्टसला दणका,सर्वात मोठ्या सोन्याच्या रिफायनरीचा मालक संकटात, शेअर बाजारात ट्रेडिंगला बंदी
Kolhapur Crime news: प्रेमाचे आमिष, ब्लॅकमेलिंग, अत्याचाराची जागा अन् माहिती ; धक्कादायक धागेदोरे हाती, आरोपींची आर्थिक परिस्थिती चांगली, पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर
प्रेमाचे आमिष, ब्लॅकमेलिंग, अत्याचाराची जागा अन् माहिती ; धक्कादायक धागेदोरे हाती, आरोपींची आर्थिक परिस्थिती चांगली, पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर
Andheri Subway Mumbai Rain: अंधेरी सब-वेसाठी आता 'आदित्य पॅटर्न'; अमित साटमांच्या पुढाकाराने 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव
अंधेरी सब-वेसाठी आता 'आदित्य पॅटर्न'; अमित साटमांच्या पुढाकाराने 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव
Dhule ACB Trap : 'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Devendra Fadnavis : अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
ममतांना पक्षाध्यक्ष ठेवलं, पण अभिषेक नको, तृणमुलचे 'सेम टू सेम शिवसेना स्टाईल'ने दोन तुकडे; 58 आमदारांना गळाला लावणारे ते दोन आमदार कोण? विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मुहूर्त साधला!
ममतांना पक्षाध्यक्ष ठेवलं, पण अभिषेक नको, तृणमुलचे 'सेम टू सेम शिवसेना स्टाईल'ने दोन तुकडे; 58 आमदारांना गळाला लावणारे ते दोन आमदार कोण? विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मुहूर्त साधला!
ह्रदयदाव्रक घटना.. मुलीला वाचविण्यासाठी युवकांची तुंगभद्रा नदीत उडी; मुलगी बचावली पण 5 जण बुडाले
ह्रदयदाव्रक घटना.. मुलीला वाचविण्यासाठी युवकांची तुंगभद्रा नदीत उडी; मुलगी बचावली पण 5 जण बुडाले
Embed widget