नवी मुंबई : 2021 वर्षाला निरोप देण्याकरता सर्वजण सज्ज झाले आहेत. पण दुसरीकडेच वाढत्या कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनवर शासनाने निर्बंध आणले आहेत. दरम्यान अशावेळी 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी हुल्लडबाजी करण्यास बाहेर निघणाऱ्यांना आळा घालण्यासाठी नवी मुंबई परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी तब्बल 2 हजार पोलीस याठिकाणी उपस्थित आहेत.
दरवर्षी 31 डिसेंबरचे सेलिब्रेशन करण्यासाठी मोठ्या संख्येने लोकं रात्री 12 नंतर रस्त्यावर उतरतात. अनेकजण मद्यप्राशन करुन हुल्लडबाजीही करतात. तर काही जण गाड्यांमधून बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करतात. यावर रोख लावण्यासाठी नवी मुंबई पोलीसांनी संपूर्ण शहरातील रस्त्यांवर आणि चौकात मोठा फौजफाटा तैनात केला आहे. यावेळी तब्बल 2 हजार पोलीस कर्मचाऱ्यांसह 4 डीसीपी, सहा एसीपी असे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित आहेत.
नवी मुंबईत कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त
नवी मुंबई पोलसांना 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी एमडी या ड्रग्सचा मोठा साठा शहरात असल्याची माहिती मिळाली होती. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून प्रथम आरोपी कलीम खामकर याला पनवेल येथून ताब्यात घेतले. अधिक माहिती घेतली असता त्याचा सहकारी जकी पिट्टू आणि सुभाष पाटील यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेत अधिक तपास केला. आरोपी सुभाष पाटील याने केमिकल इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले असल्याने त्याला ड्रग्ज पावडर बनवण्याबाबत ज्ञान होते. तपासाच्या शेवटी या तीनही आरोपींकडून तब्बल 2 कोटी 53 लाख रुपयांचे अडीच किलो एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले.
- केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून 31 डिसेंबरला मुंबईत हायअलर्ट जारी, पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द
- ओमायक्रॉनच्या धर्तीवर मुंबईची तयारी काय? पाहा कसं आहे नियोजन...
- Covid-19 Restrictions : मुंबईत संध्याकाळी 5 ते पहाटे 5 वाजेपर्यंत चौपाटी, बागा, सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha