एक्स्प्लोर

मोटरमनचे प्रँक व्हिडिओ करणाऱ्या तिघा तरुणांना अटक

मध्य रेल्वेच्या आरपीएफने मोटरमनचे प्रँक व्हिडिओ करणाऱ्या तीन तरुणांना अटक केली आहे.

मुंबई : मुंबईत लोकल चालवणाऱ्या मोटरमनला प्रश्न विचारुन त्रास देत त्यांचे व्हिडिओ शूट करणाऱ्या तरुणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या आरपीएफने तीन तरुणांना अटक केली आहे. लोकल चलावणाऱ्या मोटरमनला नाहक प्रश्न विचारुन आरोपी त्यांना त्रास द्यायचे आणि या प्रकाराचे व्हिडिओ रेकॉर्ड करुन यूट्यूब सारख्या सोशल मीडियावर पोस्ट करायचे. गेल्या वर्षी अनेक मोटरमननी याबाबत तक्रार दिल्यानंतर तिघांचा शोध घेण्यात आरपीएफला यश आलं. सोशल मीडियावर सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक जण काही ना काही करत असतात. त्यात यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करुन पैसे मिळवण्याचं फॅड सुरु झालं आहे. हीच आवड विक्रोळीतील तिघा तरुणांना महागात पडली आहे. केवळ थट्टा म्हणून मोटरमन आणि सामान्य नागरिक यांच्यासोबत हे तरुण प्रँक करायचे. ते मोबाइलमध्ये रेकॉर्ड करुन यूट्यूबवर अपलोड करायचे. एक-दोन व्हिडिओजना चांगले व्ह्यूज मिळाल्यानंतर त्यांनी सपाटाच लावला. मुख्य म्हणजे ज्या मोटरमनच्या हातात हजारो मुंबईकरांचा जीव असतो, त्यांच्यासोबत हे प्रँक केले आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल केले. याबाबत पाच मोटरमननी गेल्या वर्षी तक्रार नोंदवली होती. त्याचा तपास आरपीएफ करत होती. अखेर सायबर सेलची मदत घेऊन विक्रोळी भागातून तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर रेल्वे अॅक्टची विविध कलमं लावण्यात आली आहेत. असे प्रँक करुन लाखो प्रवाशांचे प्राण धोक्यात न आणण्याचं आवाहन आरपीएफद्वारे करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Mumbai Crime News: कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
Maharashtra Goverment Cabinet Decision: मुंबईत गोपाळकाला ऐवजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय
मुंबईत गोपाळकाला ऐवजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू

व्हिडीओ

Manoj Jarange Convoy Vehicles Accident : जरांगेंच्या ताफ्यातील 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची?
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Embed widget