एक्स्प्लोर

कमला मिल आगीप्रकरणी आणखी तीन जणांना अटक

मुंबईतील एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी ही कारवाई केली.

मुंबई : कमला मिल आगीप्रकरणी आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये कमला मिलचा संचालक भंडारी, हुक्का कंपनी निर्वाणाचा मालक पांडे आणि फायर ब्रिगेड अधिकारी पाटील यांचा समावेश आहे. एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान, कमला मिलमधील आग ही मोजो बिस्त्रोतील हुक्का पार्लरमुळेच लागल्याचा अहवाल मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला होता. यानंतर मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. खोटा अहवाल देणारा अधिकारी अटकेत मोजोस बिस्त्रो आणि वन अबोव्ह पबमध्ये अग्निरोधक यंत्रणेचे नियम पूर्ण असल्याचा खोटा अहवाल ज्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिला होता, त्याला अटक करण्यात आली आहे. आग लागण्याच्या काही दिवसांपूर्वीच हा अहवाल देण्यात आला होता. या अहवालानंतरच हे रेस्टॉरंट चालण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र हा खोटा अहवाल दिल्याचं लक्षात आल्यानंतर आता या अधिकाऱ्यावरही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी काही मोठ्या अधिकाऱ्यांना अटक होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांच्या हाती जो अहवाल लागला आहे, त्यात आणखी काही मोठ्या अधिकाऱ्यांची नावं आहेत. त्यामुळे या प्रकरणी मोठी कारवाई होऊ शकते. मोजो बिस्त्रोतील हुक्का पार्लर विनापरवाना गच्चीवर थाटण्यात आलं होतं. त्या जागेचे आणि रेस्टॉरन्ट मालक या आगीला जबाबदार असल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. दरम्यान, हा अहवाल सार्वजनिक करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या अहवालानुसार अग्निशमन दलातील 10 अधिकाऱ्यांची खातेअंतर्गत चौकशी होणार आहे. तर दोन वॉर्ड ऑफिसर आणि आरोग्य अधिकाऱ्यांचाही चौकशीत समावेश असेल. 29 डिसेंबरला मध्यरात्री कमला मिलमधील मोजोस आणि वन अबव्ह पबला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला होता. काय आहे प्रकरण? मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. गुरुवार 29 डिसेंबरच्या मध्यरात्री ही भीषण आग लागली होती. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा थरथराट, गोविंदांसाठी लाखोंंची बक्षिसं
Maharashtra Live News Updates: मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा थरथराट, गोविंदांसाठी लाखोंंची बक्षिसं
Dahihandi In Mumbai Thane Pune 2026: गोविंदा रे गोपाळा....; ठाण्यात 71 लाखांची हंडी, मुंबईतही 25 लाखांच्या हंड्या; कुठे किती लाखांचं बक्षीस?, A टू Z माहिती
गोविंदा रे गोपाळा....; ठाण्यात 71 लाखांची हंडी, मुंबईतही 25 लाखांच्या हंड्या; कुठे किती लाखांचं बक्षीस?, A टू Z माहिती
Maharashtra Residential Schools:नामांकित निवासी शाळांची तपासणी अन् मान्यता रद्द करण्यासाठी नवी कार्यपद्धती जाहीर; आदिवासी विकास विभागाचा मोठा निर्णय
नामांकित निवासी शाळांची तपासणी अन् मान्यता रद्द करण्यासाठी नवी कार्यपद्धती जाहीर; आदिवासी विकास विभागाचा मोठा निर्णय
Ghatkopar Dahihandi Row : मनसेच्या 'जेन-झी' दहीहंडीला पोलिसांची नोटीस, अमित ठाकरेंची उपस्थिती, पण त्या आधीच मोठी बातमी
मनसेच्या 'जेन-झी' दहीहंडीला पोलिसांची नोटीस, अमित ठाकरेंची उपस्थिती, पण त्या आधीच मोठी बातमी

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident News: काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
Eknath Shinde Thane: ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
Beed Well News: निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडी ठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडीठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Embed widget