मुंबई : मुंबईकरांना वर्षाअखेरिस एमएमआरडिए गिफ्ट देणार आहे. सप्टेंबरनंतर अंधेरी ते दहिसर आणि दहिसर ते डिएन नगर मार्गावर मेट्रो धावणार असल्याचं आश्वासन आर.ए. राजिव यांनी दिलं आहे. तसेच नव्या मेट्रोचा प्रवासही किफायतशिर होणार आहे. नव्या मेट्रोचं किमान तिकीट 10 रुपये तर कमाल तिकीट 80 रुपये असणार आहे. मेट्रो 2अ दहिसर ते अंधेरी आणि मेट्रो 7 दहिसर ते डिएन नगर या दोन मार्गांवरच्या मेट्रो वर्षाअखेरीपर्यंत सुरू होणार आहे. यात 30 मेट्रो स्टेशन असणार आहेत.


कसे असतील नवे मेट्रो मार्ग


मेट्रो 2ए - 18.6 किमीचा मार्ग असून त्यासाठी  6,410कोटींची तरतुद करण्यात आली आहे. या मार्गावरून  2031 पर्यंत 9 लाख प्रवासी प्रवास करणार आहेत.


मेट्रो 7 - 16.5 किमीचा मार्ग असून त्यासाठी 6,208 कोटींची तरतुद करण्यात आली आहे. या मार्गावरून 2031 पर्यंत 6.7 लाख लोक प्रवास करणार आहेत.


कसे असतील तिकीट दर
0-3 किमी : 10रु
3-12 किमी : 20रु
12-18 किमी : 30 रु
18-24 किमी : 40रु
24-30 किमी : 50रु
30-36 किमी : 60रु
36-42 किमी : 70रु
42 - 48 किमी : 80 रु


एमएमआरडिएकडून या वर्षी 180 किमी चे मेट्रो प्रकल्प हाती घेतले जात आहेत. त्यामध्ये मेट्रो2, मेट्रो 2 अ, मेट्रो 7, मेट्रो 9, मेट्रो 4, मेट्रो 5, मेट्रो 6. या प्रकल्पांचा समावेश आहे. यांपैकी मेट्रो 2अ आणि 7 यावर्षी पूर्ण होणार आहेत. तसेच मेट्रो 10,11,12,14 च्या निवीदा यावर्षी निघणार आहेत.


मोनो रेल्वे 2 वर्षानंतर सुरळीत होणार असून चार ते पाच रँक मोनोरेल्वेत चालवू शकतो. मोनो रेल्वेच्या स्पेअर पार्टची अडचण आहे. नव्या मोनोरेल्वे पुढील वर्षांपर्यंत येणार आहेत. भारतात या मोनोरेल्वेचे उत्पादक नाहीत त्यामुळे उशीर होत असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर मोनोरेल्वेची फ्रिक्वेन्सी 25 मिनीटांवरुन 15 मिनीटे,आणि नंतर 6 मिनीटे होईल.


संबंधित बातम्या : 


आरे मेट्रो कारशेडवरुन वादात अडकलेल्या मेट्रोच्या संचालिका अश्विनी भिडेंची प्रधान सचिवपदी बढती


ठाण्यातील मेट्रो-4 चा मार्ग अखेर मोकळा, आवश्यक वृक्षतोडीला हायकोर्टाचा हिरवा कंदील


मेट्रो 3 च्या स्थानकाचा व्यावसायिक वापर, महसूल वाढीसाठी सिद्धीविनायक स्थानक परिसर भाड्याने देणार