नवी मुंबई : पनवेलच्या उमरोली गावातील गाढी नदीच्या पुरात फाजील आत्मविश्वासामुळे शनिवारी एक तरुण अडकला. त्याला वाचवण्यात यश आलं असून, या घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पनवेल तालुक्यातील उमरोली गावातील नागरिकांना पावसाळ्यात गावात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. पावसाळ्यात तर अनेकदा गाढी नदी पार करूनच घरी पोहोचावं लागतं. शनिवारी या नदीला पूर आला होता.

पुरामुळे स्थानिक नागरिकांनी अजय सिंग या तरुणाला नदीतून न जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष करुन फरशीवरुन (छोटासा पूल) पुढे निघाला. पाण्याला जोर असल्याने त्याचा पाय घसरुन तो पाण्यात पडला. सुदैवाने जवळपास 100 फुटांवर कातळावर तो नदीच्या मध्यभागी अडकला व तेथेच थांबला.

यानंतर आसपासच्या नागरिकांनी याबाबत माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी ताबडतोब अग्निशमन दलाला बोलावलं. अग्निशामक दलाच्या जवानांनी दोरीच्या सहाय्याने मोठ्या प्रयत्नाने दोरीच्या सहाय्याने एक ते दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर अजय सिंगचा जीव वाचविला.

घटनेचा व्हिडीओ पाहा