एक्स्प्लोर

राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीमागील गुपित उलगडलं?

मुंबई : जयदेव ठाकरे यांनी कोर्टात दिलेल्या वादग्रस्त साक्षीवरुनच राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या भेटीला कोणतीही राजकीय किनार नसल्याचं म्हटलं जात आहे.   जयदेव यांनी संपत्तीसाठी कोर्टाची पायरी चढल्यानं कुठलाही समझोता मातोश्रीवरुन होणार नाही असं सूत्रांनी सांगितलं आहे. राज ठाकरेंसोबत कोणीही नव्हतं. राज आणि उद्धव या दोघांमध्येच सुमारे दीड तास चर्चा झाली.     आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत होते. तर बाळासाहेब ठाकरेंचा संपत्ती वाद आणि उद्धव ठाकरे- जयदेव ठाकरे यांच्यातील न्यायालयाीन लढाई या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचा अंदाज काही जणांनी वर्तवला होता.   ‘मातोश्री’वर जाऊन राज ठाकरेंनी काय केलं?   *’मातोश्री’च्या पहिल्या मजल्यावर जाऊन बाळासाहेबांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं.   *उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.   *राज यांनी उद्धवसोबत ‘मातोश्री’वर सुमारे दीड तास एकत्र चर्चा केली.    

राज – उद्धव  यांच्या यापूर्वीच्या भेटी

  1) दरम्यान, यापूर्वी  शिवसेनेच्या लोकसभेतल्या यशाबद्दल राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचं मातोश्रीवर पुष्पगुच्छ पाठवून अभिनंदन केलं होतं. महाराष्ट्रात शिवसेनेचे 18 खासदार निवडून आल्यामुळे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ पाठवला होता.   2) यापूर्वी 2012 मध्ये सुमारे साडेतीन वर्षांनी राज ठाकरे  आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती. या भेटीचं निमित्त होतं उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीचं. राज ठाकरे यांनी कुटुंबासह उद्धव ठाकरे यांची लिलावती रुग्णालयात भेट घेतली होती. छातीत दुखू लागल्याने उद्धव ठाकरेंना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज यांनी पत्नीसह उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर राज-उद्धव यांच्या भेटीची ही त्यावेळची केवळ दुसरी भेट होती.   3) २३ नोव्हेंबर २००८ मध्ये राज ठाकरे बाळासाहेबांची पुस्तकं परत करण्याच्या निमित्ताने मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यावेळी उद्धव आणि राज यांची भेट झाली होती.     *23 नोव्हेंबर 2008   बाळासाहेबांची पुस्तकं परत करण्याच्या निमित्ताने राज मातोश्रीवर   *16 जुलै, 2012   उद्धव ठाकरेंना छातीत दुखू लागल्याने राज ठाकरे लिलावती रुग्णालयात भेटीला   *20 नोव्हेंबर, 2012   बाळासाहेबांच्या अस्थिकलशाच्या दर्शनावेळी शिवाजी पार्कवर राज-उद्धव एकत्र   *3 नोव्हेंबर, 2014   राज ठाकरेंच्या मुलीला अपघात, उद्धव ठाकरे भेटीला गेले असताना राज यांची भेट   *17 नोव्हेंबर, 2014   बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला शिवतीर्थावर राज-उद्धव एकत्र   संबंधित बातम्या  

जयदेव ठाकरेंचे उद्धव यांच्यासह ठाकरे कुटुंबावर वैयक्तिक आरोप

“शिवसेनेची धुरा बाळासाहेबांना माझ्या खांद्यावर द्यायची होती”

“उद्धवनी बाळासाहेबांना अंधारात ठेवून ‘त्या’ कागदावर सही घेतली”

शिवसेनाप्रमुखांच्या मृत्यूपत्राचा वाद, जयदेव यांची 18 जुलैपासून उलटतपासणी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सुषमा अंधारेंकडून अशोक खरातचे फोटो दाखवत गंभीर आरोप; MIDC चेअरमन आवारेंचं स्पष्टीकरण, प्रसंग कथित
सुषमा अंधारेंकडून अशोक खरातचे फोटो दाखवत गंभीर आरोप; MIDC चेअरमन आवारेंचं स्पष्टीकरण, प्रसंग कथित
Mumbai Crime news: शरीरसुखाची मागणी धुडकावताच अभिनेत्याने मोलकरणीला संपवलं; दारातच बॉडी दिसली अन्.. मिरारोड हादरलं
शरीरसुखाची मागणी धुडकावताच अभिनेत्याने मोलकरणीला संपवलं; दारातच बॉडी दिसली अन्.. मिरारोड हादरलं
BMC Transfer: मोठी बातमी: मुंबई महानगरपालिकेतील बड्या अधिकाऱ्यांच्या रातोरात बदल्या, महापौर रितू तावडेंच्या वॉर्डातील 'त्या' अधिकाऱ्याची ट्रान्सफर
मुंबई महानगरपालिकेतील बड्या अधिकाऱ्यांच्या रातोरात बदल्या, महापौर रितू तावडेंच्या वॉर्डातील 'त्या' अधिकाऱ्याची ट्रान्सफर
Ashok Kharat : अशोक खरातचे व्हिडीओ पोलिसांनी व्हायरल केले का? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले की... 
अशोक खरातचे व्हिडीओ पोलिसांनी व्हायरल केले का? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले की... 

व्हिडीओ

Sanjay Raut PC : एकट्या चाकणकर नाही, केसरकर स्वतः म्हणतात मीच का? 40 आमदार जात होते
Rupali Thombre Patil : अजितदादा असते तर Rupali Chakankar यांचा लगेच सुपडा साफ केला असता
Ashok Kharat : महिलांसोबत केलेलं कृत्य विधीचा भाग, अशोक खरातच्या जबाबात काय? Special Report
Kharat Villegers : अशोक खरातचा कारनामा, गावातून पंचनामा, 'माझा'चा स्पेशल रिपोर्ट Special Report
Mamta Kulkarni  : कारनामे खरातचे, ताशेरे ममताचे, ममत कुलकर्णींचा महिलांना सवाल Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: स्ट्रेट ऑफ होर्मुझ रोखत इराणनं अवघ्या जगाचं नाकं दाबलं, पण त्याच होर्मुझच्या समुदात हाकेच्या अंतरावर तेल जहाज पेटत असतानाही इराणच्या निर्भिड चिमुकलीचा किनाऱ्यावर उंच माझा झोका!
Video: स्ट्रेट ऑफ होर्मुझ रोखत इराणनं अवघ्या जगाचं नाकं दाबलं, पण त्याच होर्मुझच्या समुदात हाकेच्या अंतरावर तेल जहाज पेटत असतानाही इराणच्या निर्भिड चिमुकलीचा किनाऱ्यावर उंच माझा झोका!
एकनाथ शिंदेंनी संस्कृती दाखवत 'साहेब' म्हटलं, पण उद्धव ठाकरेंनी...; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका
एकनाथ शिंदेंनी संस्कृती दाखवत 'साहेब' म्हटलं, पण उद्धव ठाकरेंनी...; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका
सुषमा अंधारेंकडून अशोक खरातचे फोटो दाखवत गंभीर आरोप; MIDC चेअरमन आवारेंचं स्पष्टीकरण, प्रसंग कथित
सुषमा अंधारेंकडून अशोक खरातचे फोटो दाखवत गंभीर आरोप; MIDC चेअरमन आवारेंचं स्पष्टीकरण, प्रसंग कथित
Iran War Live Update: हुथी बंडखोर सुद्धा इराणच्या युद्धात सामील; 2 हजार किमी अंतरावरून इस्रायलवर बॅलिस्टिक मिसाईल डागल्या, युएईत मिसाईलचा मलबा पडला, 5 भारतीय जखमी
हुथी बंडखोर सुद्धा इराणच्या युद्धात सामील; 2 हजार किमी अंतरावरून इस्रायलवर बॅलिस्टिक मिसाईल डागल्या, युएईत मिसाईलचा मलबा पडून 5 भारतीय जखमी
Iran War Live Update: इराणनं अणू केंद्रांवरील हल्ल्याचा बदला घेतला, सौदी अरेबियातील अमेरिकेच्या एअरबेसवर हल्ला; हवेत इंधन भरणारी तीन विमाने उद्ध्वस्त, अनेक सैनिक जखमी; इस्त्रायलकडून तेहरान विद्यापीठ टार्गेट
इराणनं अणू केंद्रांवरील हल्ल्याचा बदला घेतला, सौदी अरेबियातील अमेरिकेच्या एअरबेसवर हल्ला; हवेत इंधन भरणारी तीन विमाने उद्ध्वस्त, अनेक सैनिक जखमी; इस्त्रायलकडून तेहरान विद्यापीठ टार्गेट
Ashok Kharat and Sunil Tatkare: माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदावरुन पत्ता कापण्यासाठी अशोक खरातचा तटकरेंकडे धोशा, शरद पवार गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप
माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदावरुन पत्ता कापण्यासाठी अशोक खरातचा तटकरेंकडे धोशा, शरद पवार गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप
'या आम्ही वाट पाहतोय'! ट्रम्पकडून संभाव्य भू-आक्रमणाची चर्चा सुरू असतानाच इराणचा 'दहा लाख' सैनिकांचा हुंकार; अमेरिकेला व्हिएतनाम किंवा अफगाणिस्तानपेक्षाही भीषण दलदलीत अडकवण्याची तयारी
'या आम्ही वाट पाहतोय'! ट्रम्पकडून संभाव्य भू-आक्रमणाची चर्चा सुरू असतानाच इराणचा 'दहा लाख' सैनिकांचा हुंकार; अमेरिकेला व्हिएतनाम किंवा अफगाणिस्तानपेक्षाही भीषण दलदलीत अडकवण्याची तयारी
Ashok Kharat: धंद्यात प्रचंड तोटा, पती-पत्नी अशोक खरातकडे गेले, मंतरलेली दैवी रत्नं दिली पण....
धंद्यात प्रचंड तोटा, पती-पत्नी अशोक खरातकडे गेले, मंतरलेली दैवी रत्नं दिली पण....
Embed widget