मुंबई : आज लांबणीवर पडलेल्या अकरावी प्रवेश विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये मुंबई विभागातून 68,178 विद्यार्थ्यांनी ज्यांना पहिल्या तीन फेरीमध्ये महाविद्यालयात प्रवेश घेतले अशा विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 59,322 विद्यार्थ्यांना या विशेष फेरीमध्ये महाविद्यालय मिळाले असून 31 डिसेंबरपर्यत आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत.


23 डिसेंबरला राज्य सरकराने एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एडब्ल्यूएस वर्गातून प्रवेश घेण्याची सवलत देण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांना अर्जात बदल करून सवलत घेता यावी, यासाठी ही विशेष फेरी पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतले नव्हते. शिवाय, ज्या एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस मधून प्रवेश घ्यायचा आहे, असे एकूण मुंबई विभागातून 68,178 विद्यार्थी या फेरीत सहभागी झाले होते. यामध्ये कला शाखेतील 4487 विद्यार्थ्यांना, वाणिज्य शाखेतील 35,423 विद्यार्थ्यांना व विज्ञान शाखेतील 18819 विद्यार्थ्यांना या फेरीत महाविद्यालय मिळाले आहे.


या विशेष फेरीमध्ये मुंबई विभागात ईडब्ल्यूएस कोट्यातून 186 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. तर आतापर्यतच्या सर्व फेऱ्यामध्ये एब्ल्यूएस कोट्यातून 4614 विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले आहेत. या विशेष फेरीनंतर सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय अजूनही मिळाले नाही त्यांच्यासाठी रिक्त राहणाऱ्या जागेचा तपशील 1 जानेवारी रोजी संकेतस्थळावर जाहीर होईल.