मुंबई : काँग्रेस स्थापनादिनानिमित्त आज मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात पदभार स्वीकारला. यावेळी मंचावर उपस्थित सर्वच नेत्यांनी मुंबई महापालिकेसाठी स्वबळाची भाषा केली आहे. सुरुवातीला मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबईत स्वबळावर लढू द्या, अशी मागणी मंचावर उपस्थित नेत्यांकडून केली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनीही मुंबई महापालिकेसाठी स्वबळावर लढण्याचा इरादा बोलून दाखवला.


काँग्रेस स्थापना दिनानिमित्त आज वाय बी चव्हाण सेंटर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, प्रभारी एच के पाटील, अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष भाई जगताप, वर्षा गायकवाड, अस्लम शेख, नसीम खान, एकनाथ गायकवाड यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.


यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, 'काँग्रेस पक्षाच्या आवाजाने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक गाजणार आहे. काँग्रेस यंत्रणेने सर्व ताकद लागली तर मुंबई महापौर होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. सरकार आले, त्यात काही प्रश्न आहेत. नसीम खान यांना सांगतो काँग्रेस पक्ष श्रेष्ठ आहे. त्याचा सन्मान राखण्यात कधीच तडजोड करणार नाही. अशोक चव्हाण आणि मी हक्काने याबाबत विषय मांडू.'


काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा? आघाडी करण्याबाबत काँग्रेसमध्येच एकमत नाही?


बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीतील कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केली. तसेच मुंबईचा‌ महापौर काँग्रेसचा झाला पाहिजे, असं कार्यकर्त्यांना आवाहन केलं. यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की, भाजपला थांबवण्यासाठीच महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाले. काँग्रेससोबत नसती तर राज्यात सरकार बनलं नसतं, असं म्हणत
अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला नाव न घेता इशारा दिला. कॉमन मिनिमम प्रोग्रामसोबत कॉम्प्रमाईज करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.


मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 'आत्या-भाच्या'वर राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी!



BMC Elections | मुंबई महापालिकेवर कुणाचा भगवा फडकणार? दीड वर्ष अगोदरच ताकद आजमावणं सुरु