Old pension scheme : शासकीय सेवेत (Government Servent) 2005 पासून दाखल होणाऱ्या कर्मचाऱ्यांना (Government Employees) निवृत्ती वेतन (Pension) बंद करण्यात आले आहे. त्यामुळे हजारो शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळणार नसल्याने वृद्धपकाळात संकटांना सामोरे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून संबधित कर्मचारी आंदोलन करणार आहेत. शासनाने या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये अशी मागणी या आंदोलनकर्त्यांच्या समितीचे समन्वयक वितेश खांडेकर यांनी केली आहे. आता पर्यंत चार हजार कर्मचाऱ्यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचा रोष विविध शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये असल्याने त्याला न्याय मागण्यासाठी निर्वाणीचा लढा उभारत 24 डिसेंबर रोजी विधिमंडळावर लॉन्गमार्च धडकणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.

Continues below advertisement


जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती मध्ये महसूल, आरोग्य, शिक्षण या सह विविध विभागातील तब्बल 100 हून अधिक संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत. पडघा (Padagha) येथून सुरू झालेला हा लॉन्गमार्च मंगळवारी भिवंडीत (Bhiwandi) मुक्कामी असून बुधवारी ठाणे (Thane) मुक्कामी थांबून पुढे मुंबईकडे (Mumbai) कूच करणार आहेत. या लॉन्गमार्चमध्ये हजारो कर्मचारी सहभागी होणार असून पुढे ही संख्या वाढणार आहे, अशी माहितीही समन्वयक वितेश खांडेकर यांनी यावेळी दिली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live