एक्स्प्लोर

IIT TechFest : जगातील पहिला अ‍ॅक्टर, परफॉर्मर रोबोट ठरणार आयआयटी टेकफेस्टचं मुख्य आकर्षण

कला आणि विज्ञानाचा अनोखा मेळ साधणारा जगातील पहिला अ‍ॅक्टर,परफॉर्मर म्हणून ओळखला जाणारा रोबोथेस्पिअन टेकफेस्टला येणाऱ्या देशभरातील विद्यार्थ्यांसाठी मुख्य आकर्षण ठरणार आहे.

मुंबई : जगातील पहिला अ‍ॅक्टर,परफॉर्मर म्हणून ओळखला जाणारा रोबोथेस्पिअन यावर्षीच्या आयआयटी टेकफेस्टचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. कला आणि विज्ञानाचा अनोखा मेळ साधणारा हा रोबोट नक्कीच टेकफेस्टला येणाऱ्या देशभरातील विद्यार्थ्यांसाठी मुख्य आकर्षण ठरणार आहे. हा रोबोट आयआयटी टेकफेस्टमध्ये एका आयोजित कार्यक्रमात आपली कला प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे. IIT TechFest : जगातील पहिला अ‍ॅक्टर, परफॉर्मर रोबोट ठरणार आयआयटी टेकफेस्टचं मुख्य आकर्षण तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे रोजच्या जीवनातील रोबोटिक्सचा वापर आणि वावर सहज झाला आहे. अनेकदा हॉस्पिटल्स, हॉटेल्स, एअरपोर्ट किंवा मोठ्या कारखान्यांमध्ये रोबोटच्या मदतीने अनेक कामे पार पाडली जात असल्याने त्याचा वावर दिसतो. मात्र अभिनय करून आपले मनोरंजन करणारा किंवा एखादी कलाकृती सादर करणारा हा रोबोट अनेकांचे लक्ष वेधून घेणार आहे. IIT TechFest : जगातील पहिला अ‍ॅक्टर, परफॉर्मर रोबोट ठरणार आयआयटी टेकफेस्टचं मुख्य आकर्षण यु के बेस कंपनीने हा 5 फूट 9 इंच उंच आणि 33 किलो वजनाच्या रोबो थेस्पिअनच्या काही हालचाली या एअर मसल्स व सर्वो मोटरच्या सहायाने नियंत्रित केल्या जातात. मात्र मानवी हालचालीसारखांचं वावर असणारा हा रोबो समोरचा व्यक्ती स्त्री आहे की पुरुष? त्याचे वय आणि त्याचे चेहऱ्यावरील हावभाव सहज ओळखू शकतो. कलाकार आणि अभिनेता म्हणून ओळखला जाणारा हा रोबो 30 पेक्षा अधिक भाषांमध्ये बोलू शकतो शिवाय 70 हून अधिक विभिन्न प्रकारचे आवाजही काढू शकतो. IIT TechFest : जगातील पहिला अ‍ॅक्टर, परफॉर्मर रोबोट ठरणार आयआयटी टेकफेस्टचं मुख्य आकर्षण त्याचे शारीरिक हावभाव, मोहक हालचाली तसेच भावना व्यक्त करणारे डोळे हे त्याला परिपूर्ण असा चालत बोलता ह्युमनॉइड रोबोट बनविण्यास मदत करतात. त्याच्या शारीरिक हालचालींसोबतची एलईडी लाईट व एलसीडी डोळ्यांमधून शब्दांसोबत व्यक्त होणाऱ्या भावना समोरच्या व्यक्तीला मंत्रमुग्ध करून टाकतात. IIT TechFest : जगातील पहिला अ‍ॅक्टर, परफॉर्मर रोबोट ठरणार आयआयटी टेकफेस्टचं मुख्य आकर्षण दिलेल्या स्क्रिप्टप्रमाणे डायलॉग डिलिव्हरी करून त्यात एक्सेप्रेशन्स देणे, डान्स करणे, उत्तमरीत्या गाणे अशा कलांनी परिपूर्ण असल्याने रोबो थेस्पिअन उत्तम कलाकार आणि अभिनेता म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामधील मोशन कॅप्चर सॉफ्टवेअरमुळे तो एखाद्याची हुबेहूब नक्कल करू शकतो सोबतच गर्दीतील चेहरेही तितक्याच सहजरित्या ओळखू शकतो. त्यामुळे हा रोबोट आयआयटी टेकफेस्टमध्ये एका कार्यक्रमात संवाद साधणार असल्याची माहिती आहे. संबंधित बातम्या :  IIT TechFest : आयआयटी टेकफेस्टमध्ये भारताच्या 'तानाजी' रोबोटची जोरदार चर्चा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?Zero Hour Maha Exit Poll : महायुती की मविआ, वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार?Imtiaz Jaleel On Shinde Group : मुख्यमंत्री, गृहमंत्री पैसे वाटतात, कारवाई का नाही? जलील यांचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
Embed widget