Mumbai climate action plan 2022 : मुंबईच्या वातावरण कृती आराखड्याच्या (MCAP) अहवालाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे या अहवालाचे लोकार्पण पार पडले असून यावेळी मुंबई आणि येथील पर्यावरणाच्या दृष्टीने काही महत्त्वाची वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग मंत्री व मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान मुंबईच्या वातावरण कृती आराखड्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या कृती आराखड्याचं अनुकरण देशानं करावं असा आहे, असं म्हणतााना असं केल्यास जगातला पहिला देश आपण ठरु शकतो असंही ते म्हणाले. आपण शाश्वत विकास असेल असा प्रयत्न करायला पाहिजे आणि तसं ठरवायला पाहिजे मी या सर्वाची वाट पाहातोय, असंही ते म्हणाले.
पर्यावरण सर्वात दुर्लक्षित विषय
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ''पर्यावरणाच्या विषयावक अनेक चर्चा होतात, परिसंवाद होतात. पण हा विषय दुर्लक्षित आहे. आजचं तापमान आणि हिवाळ्यातील तापमानात मोठा फरक असतो, किती पावसाळा, किती उन्हाळा असं आपण बोलतो. मात्र याचं कारण हे पर्यावरण बदल असून आपण याची तीव्रता कमी करु शकतो. त्यासाठी पालिकेनं सुरु केलेला हा पर्याय आहे. त्यामुळे सर्वांचे अभिनंदन.''
समुद्राचं पानी पिण्यायोग्य करु
यावेळी मुंबईबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,''मुंबईकडे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असं बोललं जात, मात्र सुविधा देताना अपुऱ्या पडायला लागल्या आहेत. कधीही न झोपणाऱ्या मुंबईला अनेक प्रश्न आहेत यातील पाण्याचा प्रश्न आपण लवकरत सोडवू. मुंबईला 24 तास पाणी पुरवणार असून समुद्राचं पाणी डि-सॅलिनेशनने पिण्यायोग्य करण्याच विचार सुरु आहे.'' यावेळी बोलताना आरे वाचवणं हे माझ कर्तव्य असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.
जीव वाचवण्यासाठी हा आराखडा महत्त्वाचा
2050 सालापर्यंत काही भाग पाण्याखाली जाणार असल्याची भिती व्यक्त करण्यात आल्याने. जीव वाचवण्यासाठी हा कृती आराखडा कृतीत उतरला पाहिजे. असं महत्त्वाचं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.
हे ही वाचा -
- पहिला वातावरण कृती आराखडा तयार करण्याचा मान मुंबईला, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले लोकार्पण
- Mumbai Corona Update : मुंबईत 44 नव्या रुग्णांची नोंद, रुग्ण दुपटीच्या दरात लक्षणीय वाढ
- मुंबई पोलीस आयुक्तांचा 'डिलिव्हरी बॉय'ना इशारा, वाहतूक नियम मोडल्यास होणार 'ही' कारवाई
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha