Mumbai Corona Update :  मुंबईतील कोरोनारुग्णांची संख्या बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली आहे. पण शनिवारच्या तुलनेत आज (रविवारी) रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली आहे. आज 44 नवे कोरोनाबाधित आढळले असून काल ही संख्या 31 होती. त्यामुळे आज अधिक 13 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. पण आज देखील एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नसल्याने ही दिलासादायक गोष्ट आहे.


मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत नवे 44 कोरोनाबाधित आढळले असून 46 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  मुंबईत कमी आढळणाऱ्या रुग्णांमुळे कोरोना रुग्ण दुपटीचा दरही वाढत आहे. आज हा दर थेट 13 हजार पार गेला असून 13788 दिवसांवर पोहोचला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 345 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 44 रुग्णांपैकी 4 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 28 हजार 539  बेड्सपैकी केवळ 153 बेड वापरात आहेत.


राज्यात 251 नवे कोरोनाबाधित 


राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 251 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 448 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिलासादायक म्हणजे, मागील 24 तासांत एकाही कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला नाही.आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 448 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 77 लाख 20 हजार 922 इतकी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.09 % एवढे झाले आहे. राज्यात रविवारी एकाही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82% एवढा आहे.


हे ही वाचा -



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha