मुंबई : ऑल ड्रग्ज लायसन्स होल्डर फाउंडेशनचा 19 दिवसांपासून सुरू असणारा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून फाउंडेशनला 31 मार्च पर्यंत त्यांची जवळपास 60 ते 70 टक्के थकबाकी देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. तसेच उर्वरित रक्कम 30 एप्रिल पर्यंत देणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
फाउंडेशनच्या माहितीनुसार राज्यातील सरकारी दवाखान्यांना औषध पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांचे जवळपास मागील पाच वर्षांचे मिळून तब्बल 60 कोटी रूपये थकले आहेत. याबाबत वेळोवेळी संस्था स्थरावर पाठपुरवठा करून देखील केवळ तोंडी आश्वासनं देण्यात आली होती. त्यामुळे पुरवठादारांनी जोपर्यंत पैसे देण्याबाबतचे ठोस लेखी आश्वासन देण्यात येतं नाही तोपर्यंत आम्ही सरकारी रुग्णालयांना औषध पुरवठा करणार नाही असा पवित्रा घेतला होता. त्यामुळेच मागील 19 दिवसांपासून पुरवठादारांनी रुग्णालयांचा औषध पुरवठा बंद केला होता. अखेर याची तत्काळ दखल घेत अमित देशमुख यांनी 31 मार्च पर्यंत 60 ते 70 टक्के पैसे देण्याचं आश्वासन दिलं असल्याची माहिती फाउंडेशनचे सचिव राज गोसर आणि नितीन सूर्यवंशी यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी औषधांच्या थकीत बिलांसंबंधी सरकारी रुग्णालयांमध्ये लेखा परीक्षण करण्यात आले होते. त्यानुसार औषध पुरवठादारांना अर्थसंकल्पानंतर मिळणाऱ्या निधीतून 60 कोटी ही रक्कम देण्याचे आश्वासन देखील देण्यात आलं होतं.
याबाबत बोलताना फाउंडेशनचे सदस्य नितीन सूर्यवंशी म्हणाले की, आमचा विषय अनेक वेळा आम्ही संस्था पातळीवर चर्चा करून देखील सुटत नव्हता. याबाबत आम्ही वैद्यकीय खात्याचे मंत्री यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आम्हांला एप्रिल अखेर सर्व थकबाकी मिळेल असं आश्वासन दिलं आहे. तसेच त्यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी देखील बातचीत केली आहे. त्यामुळे आम्हांला विश्वास आहे की, लवकरच आम्हांला आमची थकबाकी मिळेल
फाउंडेशनचे सचिव राज गोसर म्हणाले की, जर मागणी मान्य झाली नाही तर पुन्हा आम्हांला आंदोलन कराव लागणार आहे. परंतु आम्हांला विश्वास आहे आमची थकीत रक्कम लवकरच आम्हांला मिळेल.
Medical Supply Stops In Hospitals | मुंबईतल्या सरकारी रुग्णालयाता औषध पुरवठा 19 दिवसांपासून बंद
संबंधित बातम्या :
मधुमेह आजारावरील इन्सुलिन उपचार देशातला मोठा मेडिकल स्कॅम? गरज नसतानाही दिली जातात औषधं
'हाफकिन' मध्ये होणार किफायतशीर औषधांची निर्मिती