मुंबई : भारतात मधुमेह आजारावर इन्सुलिन हा उपचार देशातला मोठा मेडिकल स्कॅम असल्याचं ब्रिटिश मेडिकल जनरलच्या संपादिका फियोना गोडली यांचा रिसर्च सांगतो. मधुमेहावर फक्त इन्सुलिन हा एकच पर्याय सांगणं आणि इतकचं नाही तर इन्सुलिनचा अवलंब करण्यासाठी डॉक्टर मधुमेह असणाऱ्या रुग्णाला भाग पाडतात, असंही या रिसर्चमध्ये सांगण्यात आलंय. त्यामुळे खरंच इनस्युलिनमुळे मेडिकल स्कॅम होतोय का? गरज नसताना डॉक्टर मधुमेह असलेल्या रुग्णांना इनस्युलिनचा उपचार घ्यायला सांगतात का? या प्रश्नाचं उत्तर शोधणारा हा विशेष रिपोर्ट.


एखाद्या व्यक्तीला डायबेटीज असल्याचं निदान होताच डॉक्टर लागलीच त्या व्यक्तीला औषधं सुरू करतात. परंतु, डायबेटीज झालेल्या व्यक्तीच्या रक्तातील एच बी ए वन सीचं प्रमाण सात ते आठच्या दरम्यान असलं आणि साखरेचं प्रमाण 250 पर्यंत असलं तरीही त्या व्यक्तीला औषधांची गरज नसल्याचं इंग्लंडमधील ब्रिटिश मेडिकल जर्नल या नियतकालिकाने केलेल्या पाहणीतुन समोर आलंय. गरज नसतानाही डॉक्टर केवळ औषध कंपन्यांना नफा कमावून देण्यासाठी डायबेटिजच्या रुग्णांना औषध घ्यायला भाग पाडत असल्याचा आरोप या नियतकालिकाच्या संपादिका फियोना गॉडली यांनी केलाय.

बाळासाहेब कदम यांना अडीच वर्षांपूर्वी डायबेटीस असल्याचं उघड झालं. रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त होतं आणि एच बी ए वन सी तर बारापर्यंत पोहचला होता. त्यामुळं डॉक्टरांनी लगेच औषध घेण्याचा सल्ला दिला. दिवसागणिक या औषधाचं प्रमाण वाढत गेलं. पण एकेदिवशी डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांच्या डाएट थेअरीची माहिती त्यांना समजली. बाळासाहेब कदम यांनी ती प्रत्यक्षात अंमलात आणली. रक्तातील साखरेचं प्रमाण, एच बी ए वन सी चं प्रमाण तर कमी होत गेलंच त्याचबरोबर भरमसाठ औषधनपासूनही त्यांची सुटका झाली.

डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांची डाएट थेअरी -
डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांच्या डाएट थेअरीला फॉलो करुन डायबेटिसपासून सुटका करुन घेतलेल्या अशा हजारो लोकांची उदाहरणं आपल्यासमोर आहेत. आता इंग्लंडमधील ब्रिटिश मेडिकल जर्नल या नियतकालिकाने डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांच्या थिअरीला पुष्टी देणारं संशोधन प्रसिद्ध केलंय. डायबेटीस पेशन्टला डॉक्टर लगेच औषध घ्यायला सांगतात. परंतु, त्याची गरज नसते. रक्तातील साखरेचं प्रमाण 250 पर्यंत आणि एच बी ए वन सी च प्रमाण सात ते आठ पर्यंत पोहचलं तरी ते सामान्यच असतं आणि अशावेळी औषध घेण्याची गरज नसते, असं या संशोधनातून सिद्ध झालंय. परंतु ही बाब भारतातील अनेक डॉक्टरांनाही माहित नसते. पुण्यातील डॉक्टर सुहास काशीद यांना डायबेटीस असल्याचं कळल्यावर फिजिशियन असलेल्या त्यांच्या डॉक्टर मित्राने त्यांना औषधं सुरु केली. त्यांच्या रक्तातील एच बी ए वन सी च प्रमाण बारापर्यंत पोहचलं होतं. या औषधांची आपल्याला खरंच गरज आहे का? हे स्वतः डॉक्टर असूनही काशीद यांना लक्षात आलं नाही.

शिक्षक म्हणून काम करणाऱ्या रुपा सानेंच्या बाबतीत मात्र नेमका उलट प्रकार घडला. त्यांनी सहज म्हणून डायबेटिसची चाचणी केली आणि त्यांच्या रक्तात एच बी ए वन सी चं प्रमाण तब्बल सोळापर्यंत गेल्याचं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं. परंतु, घाबरुन न जाता रुपा सानेंनी डायट कंट्रोल सुरु केलं. महत्वाचं म्हणजे कुठलंच औषध घ्यायचं नाही असं ठरवलं आणि काही महिन्यांमध्ये त्यांच्या रक्तातील एच बी ए वन सी च प्रमाण सोळावरुन चक्क सहावर आल्याचं त्या सांगतात.

नफा कमवायच्या उद्देशानं रुग्णांच्या जीवाशी खेळ -
फक्त आणि फक्त नफा कमवायचा या एकाच उद्देशानं औषध कंपन्या रुग्णांच्या जीवाशी खेळ करत असल्याचं वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनीच याआधी अनेकदा उघड केलंय. परंतु, भारतात वैद्यकीय क्षेत्रातील हे गैरप्रकार केवळ आरोपांपुरतेच मर्यादित राहतात. इंग्लंडमध्ये मात्र त्याला घोटाळा किंवा गुन्हा म्हणून पाहिलं जातं. भारतातील रुग्णांनी आणि त्याहीपेक्षा डॉक्टरांनी या गोष्टीचा गांभिर्यानी विचार करुन स्वतःमध्ये बदल करण्याची गरज आहे.
मधुमेह आजारावर पर्याय आहे का?

डायबेटिस पहिल्या स्टेजमध्ये(टाइप 1)असेल तर योग्य आहार पद्धतीचा अवलंब करुन डायबेटिस कमी होऊ शकतो. पण टाइप 2 डायबेटिसमध्ये रुग्णला शुगर लेव्हल कमी करण्यासाठी इनस्युलीन शिवाय पर्याय नसल्याने डॉक्टर स्वतः अशा रुग्णाला समजून सांगतात. अनेकदा भारतात मधुमेह उपचारावर इनस्युलीनशिवाय पर्याय नसल्याने याचा अवलंब न केल्यास शुगर लेव्हल वाढल्याने रुग्णाच्या जीवाला धोका संभवलेला असल्याचे उदाहरण आहेत. त्यामुळे यावर दर महिन्याला काही हजार रुपये खर्च केल्याशिवाय पर्याय नाही.

शुगर लेव्हलनुसार इनस्युलिनची मात्रा डॉक्टर रुग्णांना ठरवून देतात. तर दुसरीकडे काही डॉक्टर्सकडून गरज नसताना डायबिटिजवर इनस्युलिनचा उपचार बळजबरीने देत तर नाहीत ना? याचीही शहानिशा केली पाहिजे. डायबिटिज पेशंटला भारतात इनस्युलिनशिवाय इतर उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे बळजबरी हा उपचार काही डॉक्टरांकडून सांगून हजारो रुपये रुग्ण खर्च करत असताना मेडिकल स्कॅम काही प्रमाणात होत जरी असला तरी या डायबिटिजवर कायमचा उपाय शोधून काढणंही तितकंच महत्वाचं आहे.

संबंधित बातम्या :

संस्कृत बोला आणि डायबिटीस, कोलेस्ट्रॉलपासून मुक्ती मिळवा; लोकसभेत भाजप खासदाराचं वक्तव्य

डाएटकट्टा | कमी खाण्यापेक्षा कमी वेळा खाल्ल्याने आजारांवर मात | डॉ. दीक्षित

माझा कट्टा | डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्यासोबत आरोग्यदायी डाएटकट्टा