एक्स्प्लोर

माकडाचे खेळ करून पोट भरणाऱ्या कुटुंबातील राहुल महापालिका शाळेत पहिला

घरात दोन वेळच्या जेवणाची सोय नाही. अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन करायला घरात कोणी नाही. तर काही ही अडलं असेल तर हक्काने सांगण्यासाठी वडील देखील नाहीत, अशा चहूबाजूंनी संकटात सापडलेल्या मुलाची ही कहाणी.

ठाणे : कळवा येथे राहणाऱ्या एका अतिशय गरीब मुलाने दहावीत 76 टक्के मिळवून पालिका शाळेतून पहिला नंबर पटकावण्याचा मान मिळवला आहे. राहुल माने असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो ठाणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकतो. घरात दोन वेळच्या जेवणाची सोय नाही. अभ्यास करायला आजूबाजूला चांगलं वातावरण नाही. अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन करायला घरात कोणी नाही. तर काही ही अडलं असेल तर हक्काने सांगण्यासाठी वडील देखील नाहीत, अशा चहूबाजूंनी संकटात सापडलेल्या मुलाची ही कहाणी. डोक्यावर इतकं ओझं असताना राहुलने जिद्द मात्र सोडली नाही. अभ्यास करून आपण आपली परिस्थिती बदलू शकतो याची जाणीव राहुलला लहान वयातच आली होती. म्हणूनच त्या जाणिवेतून निर्माण झालेल्या प्रगल्भतेमुळे राहुलने शाळेत पहिला नंबर पटकावला आहे. माकडाचे खेळ करून पोट भरणाऱ्या कुटुंबातील राहुल महापालिका शाळेत पहिला राहुल एका पत्र्याच्या घरात सध्या राहतो. त्याची आई माकडाचे खेळ करून आणि प्रसंगी वेठबिगारी करून आपल्या दोन मुलांचं जेवण आणि शिक्षण भागवते. त्याचे वडील संसार उघड्यावर टाकून पळून गेले आहेत. त्यामुळे घराची जबाबदारी आता राहुल वरच येणार आहे. या आपल्या हलाखीच्या परिस्थितीची जाणीव ठेवून राहुलने चिकाटीने अभ्यास केला. ज्या ठिकाणी राहतो तिथे प्रचंड गोंगाट असल्याने जवळच्या बुद्धविहारात जाऊन पाठांतर केले. इतकेच नाही तर आजूबाजूच्या लहान मुलांना शिकवण्याचं काम देखील तो याच वेळी करत होता. अशा प्रकारे अभ्यास करून आज त्याने उज्वल यश मिळवले आहे. राहुलने अभ्यासाबरोबरच खेळायल देखील तितकाच वेळ दिला. दिवसात तीन तास तो खेळायचा, त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला असलेल्या झोपडपट्टीतील मुलांना शिकवण्याचे काम देखील तो यावेळी करायचा. त्यातून जो वेळ उरायचा त्यात त्याने अभ्यास केला.आता शिक्षक बनण्यासाठी जे शिक्षण घ्यावे लागेल ते सर्व घेण्याची तयारी दर्शवली आहे. आणि आयुष्यात मोठं होऊन त्याला एक उत्तम शिक्षक बनायचे आहे. त्यासाठी तो आता प्रयत्न करणार आहे. राहुलच्या आईने देखील त्याला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यात पूर्णतः मदत करणार असल्याचे सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Konkan Railway : गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकण रेल्वेचा बोजवारा; मुंबईहून सुटणाऱ्या गाड्या 3 ते 4 तासाने तर लांब पाल्याच्या गाड्या तब्बल 8 तासांनी उशिरा; प्रवाशांच्या हाल
गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकण रेल्वेचा बोजवारा; मुंबईहून सुटणाऱ्या गाड्या 3 ते 4 तासाने तर लांब पाल्याच्या गाड्या तब्बल 8 तासांनी उशिरा; प्रवाशांच्या हाल
Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मनोज जरांगे पाटलांनी मुंबई पोलिसांना धाडलं पत्र, 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी मागितली, पोलिसांचं वेट अँड वॉच धोरण
मनोज जरांगे पाटलांनी मुंबई पोलिसांना धाडलं पत्र, 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी मागितली, पोलिसांचं वेट अँड वॉच धोरण
Shivsena UBT Dasara Melava 2026: मोठी बातमी! शिवाजी पार्कवर ठाकरेंचीच डरकाळी; दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडून ठाकरेंच्या शिवसेनेला परवानगी
मोठी बातमी! शिवाजी पार्कवर ठाकरेंचीच डरकाळी; दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडून ठाकरेंच्या शिवसेनेला परवानगी
Ganesh Chaturthi 2026 : गणेशोत्सवासाठी भारतीय रेल्वे 386 विशेष रेल्वे गाड्या चालवणार, मुंबईत मेट्रोची मध्यरात्रीपर्यंत सेवा सुरु राहणार, कोकणात जाणारी वाहनं खालापूरमार्गे वळवली 
गणेशोत्सवासाठी भारतीय रेल्वे 386 विशेष रेल्वे गाड्या चालवणार, मुंबईत मेट्रोची मध्यरात्रीपर्यंत सेवा सुरु राहणार

व्हिडीओ

Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar Post:
"दादांची रांगोळी पाहिली अन् मन थांबलं..."; अजितदादांच्या आठवणीने सुनेत्रा पवार पुन्हा भावूक, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
Chhatrapati Sambhajinagar : गंगापूर-खुलताबादमधील एक हजार 86 शिक्षकांची वेतनवाढ रोखली; शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश, मुख्यालयी न राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
गंगापूर-खुलताबादमधील एक हजार 86 शिक्षकांची वेतनवाढ रोखली; शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश, मुख्यालयी न राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
Ganesh Chaturthi 2026 : गणेशोत्सवासाठी भारतीय रेल्वे 386 विशेष रेल्वे गाड्या चालवणार, मुंबईत मेट्रोची मध्यरात्रीपर्यंत सेवा सुरु राहणार, कोकणात जाणारी वाहनं खालापूरमार्गे वळवली 
गणेशोत्सवासाठी भारतीय रेल्वे 386 विशेष रेल्वे गाड्या चालवणार, मुंबईत मेट्रोची मध्यरात्रीपर्यंत सेवा सुरु राहणार
Mumbai Rain BMC: आधीच मुंबईत धो-धो पाऊस, त्यात मुंबई महानगरपालिकेने अचानक 'हे' चार रेल्वे पूल बंद केले, दोन दिवस महत्त्वाचा अलर्ट
आधीच मुंबईत धो-धो पाऊस, त्यात मुंबई महानगरपालिकेने अचानक 'हे' चार रेल्वे पूल बंद केले, दोन दिवस महत्त्वाचा अलर्ट
Nagpur Crime News: मुलाला जादूटोण्याने मारल्याचा संशय; सासऱ्याने सूनेला डोक्यात कुऱ्हाड टाकून संपवलं, नंतर स्वत: विहिरीत... नागपूरमधील धक्कादायक घटना
मुलाला जादूटोण्याने मारल्याचा संशय; सासऱ्याने सूनेला डोक्यात कुऱ्हाड टाकून संपवलं, नंतर स्वत: विहिरीत... नागपूरमधील धक्कादायक घटना
Sanjay Gaikwad: 'बाप तो बाप रहेगा, पण बाई बापासारखं शरीर कुठून आणणार?' असं विधान करणे आमदार संजय गायकवाडांना भोवलं; महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल
'बाप तो बाप रहेगा, पण बाई बापासारखं शरीर कुठून आणणार?' असं विधान करणे आमदार संजय गायकवाडांना भोवलं; महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल
India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Embed widget