एक्स्प्लोर

बनावट स्टॅम्प बनवून कोट्यवधीचा महसूल बुडवणारी टोळी जेरबंद

ही टोळी तीन ते चार महिन्यांपासून हे काम करत होती. परिणामी सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडाला होता.

ठाणे : महसूल खात्याचे बनावट सरकारी स्टॅम्प बनवून, पावती बुक छापून कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या टोळीला ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी टोळीतील सदस्यांकडून एक कोटी 28 लाख रुपयांची 156 बनावट पावती पुस्तकं, तसंच लॅपटॉप, मोबाईल, पेन ड्राईव्हही जप्त करण्यात आले आहेत. ही टोळी तीन ते चार महिन्यांपासून हे काम करत होती. परिणामी सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडाला होता. या टोळीतील एकूण दहा जणांना अटक करण्यात आली आहे. ही टोळी कळवा परिसराच्या आजूबाजूला कार्यरत होती. टोळीतील एक सदस्य 11 जुलै रोजी कळवा रेती वाहतूक परवान्याची बनावट पावती पुस्तक घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे खंडणी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर ठाण्याचे तहसीलदार मुकेश पाटील यांना घेऊन ठाणे पोलिसांनी संबंधित जागेवर सापळा रचला. यात विकी विभीषण माळी (वय 25 वर्ष) याला ताब्यात घेतलं. त्याची झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडून रेती वाहतूक परवान्याची बनावट पावती पुस्तकं सापडली. यानंतर तहसीलदार मुकेश पाटील यांनी विकीविरुद्ध कळवा पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याची चौकशी केली असता टोळीतील आणखी नऊ नावं समोर आली. यानंतर कारवाई करत पोलिसांनी या नऊ जणांना अटक केली. अब्दुल समद बहाउद्दीन खान (वय 35 वर्ष), पद्माकर दत्ताराम राणे (वय 29 वर्ष), शाजी वल्लीथ पुन्नन (वय 45 वर्ष), अरविंद सूर्यकांत पेवेकर (वय 30 वर्ष), प्रशांत रघुनाथ म्हात्रे (वय 33 वर्ष), धनसुख उर्फ लकी ईश्वरभाई सुतार (वय 31 वर्ष), उमेश गजोधर यादव (वय 34 वर्ष), राजू माधव पवार (वय 30 वर्ष), रवी वेदप्रकाश जैस्वाल (वय 40 वर्ष) अशी अटक झालेल्यांची नावं आहेत. दरम्यान, या प्रकरणात आणखी काही आरोपींची नाव निष्पन्न होण्याची शक्यता असल्याचं पोलिस उपायुक्त दीपक देवराज म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray 2008 Railway Case: गेल्या सुनावणीत म्हणाले, मला गुन्हा मान्य नाही; आज राज ठाकरे पुन्हा ठाणे न्यायालयात हजर राहणार, नेमकं प्रकरण काय?
गेल्या सुनावणीत म्हणाले, मला गुन्हा मान्य नाही; आज राज ठाकरे पुन्हा ठाणे न्यायालयात हजर राहणार, नेमकं प्रकरण काय?
NTAचे DG असणाऱ्या IAS सुबोध कुमार सिंह बक्षीस का? NEET पेपरफुटीवर जयंत पाटील भडकले
NTAचे DG असणाऱ्या IAS सुबोध कुमार सिंह बक्षीस का? NEET पेपरफुटीवर जयंत पाटील भडकले
Devendra Fadnavis On Minister Foreign Tours: सर्व परदेश दौरे रद्द करा, देवेंद्र फडणवीसांचे मंत्री आणि अधिकाऱ्यांना आदेश; राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यांचा आढावा घेतला जाणार
सर्व परदेश दौरे रद्द करा, देवेंद्र फडणवीसांचे मंत्री आणि अधिकाऱ्यांना आदेश; राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यांचा आढावा घेतला जाणार
Thane Crime News: आई अन् भावांनीच रचला बहिणीविरुद्ध कट; वडिलांच्या मृत्यूनंतर खोटी सही, कोट्यवधींची मालमत्ता हडपली, बनावट मृत्यूपत्र अन्..., ठाण्यात नेमकं काय घडलं?
आई अन् भावांनीच रचला बहिणीविरुद्ध कट; वडिलांच्या मृत्यूनंतर खोटी सही, कोट्यवधींची मालमत्ता हडपली, बनावट मृत्यूपत्र अन्..., ठाण्यात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sunil Shelke Mumbai : भाजपसोबत जाणार का? रोहित पवारांच्या दाव्यावर सुनील शेळके काय म्हणाले?
Rohit Pawar On Sunil Shelke : मी कर्जत जामखेडमधूनच निवडणूक लढवणार! रोहित पवार यांचं स्पष्टीकरण
Rohit Pawar on Sunil Tatkare Praful Patel : सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल भाजपतून लढणार
Mateen Patel Home Demolish : नगरसेवक मतीन पटेल यांच्या घराचं पाडकाम, पालिका अधिकारी काय म्हणाले_
Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेत H-1B व्हिसा असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 30% वाढीचा प्रस्ताव, भारतीयांसाठी धोक्याची घंटा?
अमेरिकेत H-1B व्हिसा असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 30% वाढीचा प्रस्ताव, भारतीयांसाठी धोक्याची घंटा?
Beed : बीडमध्ये पुन्हा क्षीरसागर विरुद्ध पंडित संघर्ष; विकासकामांच्या बैठकीवरून दोन्हीआमदार आमनेसामने
बीडमध्ये पुन्हा क्षीरसागर विरुद्ध पंडित संघर्ष; विकासकामांच्या बैठकीवरून दोन्हीआमदार आमनेसामने
नितीन गडकरी बसने प्रवास करणार, ताफ्यातल्या 50 गाड्या कमी; केंद्रीयमंत्री प्रताप जाधव यांचाही मेट्रोने प्रवास
नितीन गडकरी बसने प्रवास करणार, ताफ्यातल्या 50 गाड्या कमी; केंद्रीयमंत्री प्रताप जाधव यांचाही मेट्रोने प्रवास
Pune Crime News: पुण्यात घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्....; नेमकं काय घडलं?
पुण्यात घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्....; नेमकं काय घडलं?
ठाणे महापालिकेतील महिला डॉक्टराने संपवले जीवन, प्रशासनात खळबळ; घराच्या 6 व्या मजल्यावरुन मारली उडी
ठाणे महापालिकेतील महिला डॉक्टराने संपवले जीवन, प्रशासनात खळबळ; घराच्या 6 व्या मजल्यावरुन मारली उडी
Thalapathy Vijay: तमिळनाडूत AIDMKमध्ये अखेर उभी फूट पडलीच; सरकार स्थापनेत एकेका मतासाठी संघर्ष केलेल्या सीएम विजयना बहुमताच्या चाचणीत तब्बल 25 बंडखोर आमदारांचा पाठिंबा!
तमिळनाडूत AIDMKमध्ये अखेर उभी फूट पडलीच; सरकार स्थापनेत एकेका मतासाठी संघर्ष केलेल्या सीएम विजयना बहुमताच्या चाचणीत तब्बल 25 बंडखोर आमदारांचा पाठिंबा!
Sunil Tatkare And Praful Patel NCP Politics: सुनील तटकरेंनी सुनेत्रा पवारांना तो मेसेज देण्याचा केला प्रयत्न; काल गुवाहाटीवरुन निघताना काय घडलं?, NCP ची इनसाईड स्टोरी
सुनील तटकरेंनी सुनेत्रा पवारांना तो मेसेज देण्याचा केला प्रयत्न; काल गुवाहाटीवरुन निघताना काय घडलं?, NCP ची इनसाईड स्टोरी
आठ वर्षांनंतर ट्रम्प चीन दौऱ्यावर; एलाॅन मस्क, कुकसह तब्बल 17 सीईओंची फौज सुद्धा सोबत; इतिहासातील सर्वात मोठा विमान करार होणार?
आठ वर्षांनंतर ट्रम्प चीन दौऱ्यावर; एलाॅन मस्क, कुकसह तब्बल 17 सीईओंची फौज सुद्धा सोबत; इतिहासातील सर्वात मोठा विमान करार होणार?
Embed widget