एक्स्प्लोर

चुकून घर पाडलं, ठाणे महापालिकेच्या कारवाईमुळे कुटुंब रस्त्यावर!

त्यांचं घरही धोकादायक झालेलं नव्हतं. मात्र तरीही महापालिकेने गेल्या शुक्रवारी अचानक माड्ये कुटुंबाचं हे राहतं घर पाडून टाकलं.

ठाणे : ठाणे महापालिकेने चुकीच्या कारवाईमुळे एका कुटुंब रस्त्यावर आलं आहे. ठाण्याच्या नौपाडा भागात एका धोकादायक इमारतीवर कारवाई करण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या पथकाने, या इमारतीच्या मागे असलेल्या घरावर कारवाई केली. मात्र यात पोलिस आणि महापालिका प्रशासनाने हात झटकण्याचा प्रयत्न केल्याने, आता या प्रकरणातून वेगळ्याच संशयाचा धूर येऊ लागला आहे. ठाण्याच्या नौपाडा भागात घंटाळी मंदिराजवळ जेम्स कॉटेज ही इमारत आहे. 1980 साली बांधलेली ही इमारत धोकादायक बनल्याने, 2015 साली ठाणे महापालिकेने तिचा धोकादायक इमारतींमध्ये समावेश करत, रहिवाशांना जागा सोडण्याची नोटीस बजावली होती. त्यानुसार इथले रहिवासी स्थलांतरितही झाले. मात्र या इमारतीच्या उभारणीच्या आधीपासून इथे माड्ये कुटुंब अजूनही वास्तव्यास होतं. शिवाय त्यांचं घरही धोकादायक झालेलं नव्हतं. मात्र तरीही महापालिकेने गेल्या शुक्रवारी अचानक माड्ये कुटुंबाचं हे राहतं घर पाडून टाकलं. शिवाय इमारतीत राहणाऱ्या वकील शिल्पा सावंत यांच्या घराचं कुलूप तोडून त्यांचं सामान फेकून देण्यात आलं. चुकून घर पाडलं, ठाणे महापालिकेच्या कारवाईमुळे कुटुंब रस्त्यावर! यानंतर हादरलेल्या माड्ये कुटुंबाने सावंत यांच्यासह याबाबत नौपाडा प्रभाग समितीशी संपर्क साधला असता इमारतीवर कारवाई करायची होती, मात्र चुकून तुमच्या घरावर कारवाई झाली, असं धक्कादायक उत्तर नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त मारुती गायकवाड यांनी त्यांना दिलं. शिवाय सोमवारपर्यंत नवीन घर बांधून देण्याचं आश्वासनही दिलं. तर शिल्पा सावंत यांच्या घरातलं गायब झालेलं सामान कुठे आहे? याबाबत उत्तर देण्यातही ते असमर्थ ठरले. या संपूर्ण प्रकरणाची आणखी एक बाजू म्हणजे जेम्स कॉटेज इमारतीतील रहिवाशांनी एका विकासकाला जुनी इमारत पाडून नवीन इमारत उभारण्याचे हक्क दिले आहेत. मात्र त्यात अडथळा ठरणारं माड्ये यांचं घर अशाप्रकारे चुकून पाडण्यात आल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळे याबाबत ठाणे महापालिका प्रशासनाची बाजू जाणून घेण्याचाही आम्ही प्रयत्न केला. यावेळी फक्त इमारतच नव्हे, तर संबंधित घरही धोकादायक होतं, असं उत्तर अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं. शिवाय मारुती गायकवाड यांच्याबाबत होत असलेल्या या आरोपांची चौकशी करुन आयुक्तांना अहवाल सादर करण्यात येईल, असं आश्वासन महापालिका उपयुक्त संदीप माळवी यांनी दिलं आहे. महापालिकेच्या या कारवाईनंतर शिल्पा सावंत आणि माड्ये कुटुंबीयांनी नौपाडा पोलीस ठाण्यातही धाव घेतली. शिल्पा सावंत यांच्या घरातलं सामान गहाळ झाल्याप्रकरणी आणि अनधिकृतपणे घर तोडल्याप्रकरणी पोलिसांनी तक्रार घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र पोलिसांनी पाच तास बसवून ठेवूनही कुठलीही कारवाई केली नाही, असा आरोप केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार

Embed widget