एक्स्प्लोर
Advertisement
मनसेचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, शेतकरी कुटुंबं सहभागी
मनसेने ठाण्यात आयोजित केलेल्या शेतकरी मोर्चात शेतकरी आसूड, वेसण, भाजीपाला घेऊन सहभागी झाले होते.
ठाणे : ठाण्यात मनसेतर्फे आयोजित शेतकरी महामोर्चामध्ये मनसे कार्यकर्त्यांसह शेतकरी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या शहरांमध्ये निर्भयपणे आणि थेट बाजारात शेतमाल विकता आलाच पाहिजे, अशी मोर्चेकऱ्यांची मागणी होती.
ठाण्यात गावदेवी मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोचा काढण्यात आला होता. ज्या शेतकरी कुटुंबातील कर्त्याधर्त्याने आत्महत्या केली, अशी कुटुंबंही या मोर्चात सहभागी झाली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मोर्चाला उपस्थित राहिले नसले, तरी बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई, रिटा गुप्ता, शिरीष सावंत, अविनाश जाधव यासारखे संपूर्ण महाराष्ट्रातील नेते, पदाधिकारी मोर्चाला हजर होते.
MNS Protest | आंबा स्टॉल वादाच्या पार्श्वभूमीवर एल्गार, मनसेचा शेतकरी मोर्चा | ठाणे
मनसेच्या शेतकरी मोर्चात आसूड घेऊन शेतकरी आले होते. कोणी वेसण घेऊन, तर कोणी भाजीपाला घेऊन या मोर्चात आले होते. सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव व्हावी, यासाठी त्यांनी हे सर्व साहित्य आणलं होतं.
या मोर्चात शेतकऱ्यांची संख्या कमीच होती, मात्र प्रकल्पग्रस्त, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची संख्याही कमी असल्याचं दिसलं. याबाबत अविनाश जाधव यांना विचारलं असता त्यांनी 'एक शेतकरी लाखांच्या बरोबरीचा असतो' असं म्हणत वेळ मारुन नेली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement