ठाणे : ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनचं आज ठाण्यात आयोजन करण्यात आलं होतं. दरवर्षीप्रमाणे यंदाही या मॅरेथॉन स्पर्धेत शेकडो स्पर्धकांनी सहभाग भाग घेतला होता. स्पर्धेत 21 किमी पुरुष गटात करण सिंगने तर 10 किमी महिला गटात नाशिकच्या आरती पाटीलने बाजी मारली. स्पर्धेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित असतील.


'स्मार्ट सिटी, स्मार्ट मॅरेथॉन', असं आजच्या स्पर्धेचं ब्रीदवाक्य होतं. स्पर्धेसाठी देशभरातून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडू दाखल झाले होते. महापौर मीनाक्षी शिंदे यांनी स्पर्धेला फ्लॅगऑफ केल्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत 12 वर्षांखालील लहान मुलांसाठी, 18 वर्षांखालील किशोरवयीन मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिक आणि रन फॉर स्मार्ट सिटीची स्पर्धा आय़ोजित करण्यात आली होती.


पहिला स्थान पटकावलेला खेळाडू बाद


पुरुषांच्या मुख्य स्पर्धेत पिंटू यादव याने पहिलं स्थान पटकावलं होतं. मात्र त्याच्या चिपचं लोकेशन मिळत नसल्याचं कारण देत त्याला बाद करण्यात आलं. त्यामुळे करण सिंग याला प्रथम क्रमांक देण्यात आला.


ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन निकाल


21 किमी पुरुष गट




  • करण सिंग (1.10.03)

  • धनवत रामसिंग (1.10.12)

  • ज्ञानेश्वर मोरघा (1.10.38)


10 किमी महिला गट




  • आरती पाटील (1.27.47)

  • प्राजक्ता गोडबोले (1.28.25)

  • अक्षय्या जडियार (1.35.34)