Vaishnavi Hagavane death case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी (Vaishnavi Hagavane death case) महत्वाची अपडेट समोर आली आहे. वैष्णवीचं बाळ ठेवणारा आरोपी निलेश चव्हाणच्या (Nilesh Chavan) विरोधात स्टँडिंग वॉरंट इशू केलं आहे. याबाबतची माहिती पोलिस उप आयुक्त विशाल गायकवाड यांनी दिली. त्यामुळं आता निलेश चव्हाणच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पोलिसांच्या कारवाईला आता वेग आला आहे.
स्टँडिंग वॉरंट म्हणजे काय ?
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी कारवाईला वेग आला आहे. वैष्णवीचं बाळ ठेवणाऱ्या आरोपी निलेश चव्हाणच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट इशू केलं आहे. पण स्टँडिंग वॉरंट म्हणजे नेमकं काय? तर आपली ओळख लपवून जर एकदा आरोपी फरार असेल तर त्याच्या स्थावर आणि जमंग मालमत्ता जाहीर उद्घोषणा केली जाते आणि मालमत्ता जप्त करण्यात येते.
शशांक हगवणे, लता हगवणे, करिष्मा हगवणेंच्या पोलिस कोठडीतही वाढ
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी शशांक हगवणे, लता हगवणे, करिष्मा हगवणे या तिघांना आधी 11 दिवस पोलीस कोठडी होती. आज पुन्हा 1 दिवस ही पोलीस कोठडी वाढवून दिली आहे. तर राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
निलेश चव्हाण फरार, तपासासाठी तीन पथकं
निलेश चव्हाणवर 22 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण तेव्हापासून तो फरार आहे. याच निलेश चव्हाणच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची चार पथकं आणि पुणे पोलिसांची तीन पथकं राज्यात आणि देशातील इतर राज्यांमध्येही शोध घेत आहेत. त्याचं लोकेशन मिळावं यासाठी टेक्निकल एक्स्पर्ट्सचीही मदत घेतली जात आहे. निलेश हा वैष्णवी हगवणेची नणंद करिश्माचा मित्र आहे. केवळ एवढंच नाही तर स्वतःच्या पत्नीचा छळ केल्याप्रकरणी 2022 मध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्वतःच्या पत्नीचे स्पाय कॅमेऱ्याने आक्षेपार्ह व्हिडीओ शूट केल्याबद्दल पत्नीने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. निलेश चव्हाणवर वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि बंदुकीचा धाक दाखवत वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप आहे. दरम्यान, आज वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पुणे कोर्टात सुनावणी पार पडली आहे. यावेळी आरोपी निलेश चव्हाणच्या (Nilesh Chavan) विरोधात स्टँडिंग वॉरंट इशू केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
Vaishnavi Hagawane : निलेश चव्हाणला आरोपी करणे चुकीचं, उलट त्याने बाळाची काळजी घेतली; राजेंद्र हगवणेंच्या वकिलांचा युक्तिवाद