एक्स्प्लोर

अडीच लाख परत मागणाऱ्या 57 वर्षीय महिलेवर जीवघेणा हल्ला

व्यापारासाठी दिलेले अडीच लाख रुपये मागण्यासाठी गेलेल्या 57 वर्षीय महिलेवर चौघांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना ठाण्यात घडली आहे.

ठाणे : व्यापारासाठी दिलेले अडीच लाख रुपये मागण्यासाठी गेलेल्या 57 वर्षीय महिलेवर चौघांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना ठाण्यात घडली आहे. फायबरच्या स्टीकने केलेल्या बेदम मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या डोक्याला 22 टाके पडले आहेत. ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे . ठाण्यातील सावरकर नगर भागात राहणाऱ्या सावित्री विजय सिंह यांच्याकडून व्यापारासाठी शामू तिवारी यांनी अडीच लाख रुपये घेतले होते. रक्कम मागण्यासाठी वारंवार फोन केल्यानंतरही शामू तिवारी फोन उचलत नाहीत, तसंच प्रत्यक्ष गेल्यानंतर भेटत नाहीत, असं सावित्री यांनी सांगितलं. फिर्यादी सावित्री विजय सिंह पैसे मागण्यासाठी रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास विष्णूनगरमधील भक्ती मंदिर मैदान परिसरात असलेल्या तिवारीच्या कार्यालयात गेल्या. त्यावेळी शामू तिवारी नव्हते. मात्र शाब्दिक चकमक झाल्यानंतर त्यांचा पुतण्या रमेश गिरी आणि त्याच्यासोबत काम करणारे दशरथ, मनोज आणि बाबाजी यांनी सावित्री सिंह यांना फायबर काठीने बेदम मारहाण केली. फायबर काठीने सावित्री यांच्या कमरेवर, हातावर, पायावर डोक्यावर प्रहार करुन ठार मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या सावित्री सिंह यांना उपचारासाठी ठाण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मारहाणीत सावित्री यांच्या डोक्याला 22 टाके पडले आहेत, तर हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात आरोपी शामू तिवारी, रमेश गिरी, मनोज, दशरथ आणि बाबाजी यांच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी चौघा जणांना अटक केली आहे. तर मुख्य आरोपी शामू तिवारी हा अद्याप फरार असून नौपाडा पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Embed widget