एक्स्प्लोर
ठाण्यात चौघांना चावलेल्या भटक्या कुत्र्याची हत्या
चौघांना चावा देणाऱ्या पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याची ठाण्यात हत्या करण्यात आली आहे.

ठाणे : ठाण्यात रस्त्यावर आणि गल्लोगल्ली फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चौघांना चावलेल्या भटक्या कुत्र्याची हत्या करण्यात आली आहे. ठाण्यात जिल्हा न्यायालयासमोर पिसाळलेल्या कुत्र्याने चौघा जणांचा चावा घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. या कुत्र्यानं 53 वर्षीय महिलेच्या डाव्या पायाचा, 25 वर्षीय तरुणीच्या उजव्या हाताचा, आठ वर्षीय विवेश या मुलाच्या मांडीचा चावा घेतला तर रोहित पवार या एक वर्षाच्या मुलाला ओरबाडलं. सध्या या जखमींना ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या प्रकारामुळे संतापलेल्या नागरिकांनी या कुत्र्याला ठार मारलं.
Before You Go
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य





















