एक्स्प्लोर
आईच्या निधनानंतर अमेरिकेहून आलेल्या लेकीची ठाण्यात आत्महत्या
ठाणे : आईच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर दुःखात बुडालेल्या मुलीने 27 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ठाण्याच्या माजिवडा भागातील रुस्तमजी अरबानिया या सोसायटीत रविवारी ही घटना घडली.
हेतल परमार आपल्या पतीसोबत अमेरिकेमध्ये राहायच्या. आईच्या निधनाची बातमी समजल्यानंतर त्या विमानाने मुंबईच्या दिशेने यायला निघाल्या होत्या. त्यांचं माहेर पुण्यात असल्यामुळे मुंबई विमानतळावर
उतरल्यानंतर हेतल ह्या सासू आणि सासरे यांच्यासोबत थेट पुण्याला आईच्या अंत्यसंस्कारांसाठी जाणार होत्या.
हेतलच्या विमानाच्या लँडिंगचा अंदाज घेऊन सासू-सासरे विमानतळावर त्यांना आणण्यासाठी गेले होते. मात्र त्यांचा फोन बंद होता. हेतल थेट आपल्या सासरी म्हणजे माजिवडा येथील घरी आल्या. नंतर त्यांनी त्याच बिल्डिंगच्या 27 व्या मजल्यावर जाऊन उडी मारुन आत्महत्या केली.
आत्महत्या झाल्याचं कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चौकशीमध्ये हेतल यांच्या पर्समध्ये डिप्रेशनच्या गोळ्या सापडल्या आहेत, तसंच त्यांच्यावर एका वर्षापासून डिप्रेशनची ट्रीटमेंट सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement