एक्स्प्लोर

Raj Thackeray Press Conference : राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील दहा महत्त्वाचे मुद्दे  

राज्यभरात आज मनसेचं भोंग्यांविरुद्ध आंदोलन सुरु आहे. परंतु पोलिसांनी खबरदारी घेत मनसे अधिकाऱ्यांची धरपकड सुरु केली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत काय म्हटलं?

मुंबई : राज्यभरात आज मनसेचं भोंग्यांविरुद्ध आंदोलन सुरु आहे. ज्या मशिदींवर भोग्यांवर अजान वाजेल तिथे हनुमान चालीसा लावली जात आहे. परंतु पोलिसांनी खबरदारी घेत मनसे अधिकाऱ्यांची धरपकड सुरु केली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. "पोलीस मनसैनिकांना नोटीस पाठवत आहेत. माझ्या मनसैनिकांना ताब्यात घेतलं जातंय, हे आमच्या बाबतीच का घडतंय? कायदा न पाळणाऱ्यांना मोकळीक दिली जातेय," असा आरोप त्यांनी केला. सोबतच भोंग्यांचा विषय फक्त एका दिवसाचा नाही, भोंगे उतरत नाही तोपर्यंत मनसेचं आंदोलन सुरुच राहणार असंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. पाहूया राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे दहा मुद्दे  

1. मनसैनिकांना नोटीस पाठवत आहेत. माझ्या मनसैनिकांना ताब्यात घेतलं जातंय, हे आमच्या बाबतीच का घडतंय? कायदा न पाळणाऱ्यांना मोकळीक दिली जातेय

2. आज 90-92 टक्के ठिकाणी भोंग्यांविना सकाळची अजान. मशिदीमधील मौलवींचं मी आभार मानेन, आमचा विषय आहे तो विषय त्यांना समजला.

3. मुंबईतील 1140 पैकी 1005 मशिदींवरचे भोंगे वाजले नाहीत, तर 135 मशिदींवर पहाटे पाच आधी भोंग्यांवरुन अजान, त्यांच्यावर कारवाई करणार का?

4. केवळ मशिदीवरच्या भोंग्याचा प्रश्न आहे असं  नाही, मंदिरावरील भोंग्यांचाही त्रास होत असेल तर तो बंद व्हायला हवा. 

5. मुंबईतील ज्या मशिदी आहेत त्यापैकी बहुतेक अनधिकृत आहेत, त्या अनधिकृत मशिदीवरील भोंग्यांना अधिकृत परवानगी कशी काय देता? 

6. मशिदींना वर्षभरासाठी भोंग्यांची परवानगी कशी मिळते. आम्हाला परवानगी देताना दिवसाची देता, सणासुदीची 10-12 दिवसाची परवानगी देता. मग यांना 365 दिवस कशी? 

7. हा सामाजिक विषय आहे, याला धार्मिक वळण जर त्यांनी दिला तर आम्हीही धार्मिक वळण देऊ. शांतता बिघडावी अशी आमची अजिबात इच्छा नाही.

8. आमचं आंदोलन एक दिवसापुरतं नाही, जोपर्यंत भोंगे उतरणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहिल.

9. मोबाईलच्या काळात माणसं पकडून काय होणार आहे? अजून 60-70 च्या दशकात आहात का? राज ठाकरेंचं भाषण सुरु झाल्यावर वीज बंद करुन भाषण थांबणार आहे का? 

10. ज्या ज्या मशिदीतील मौलवी ऐकणार नाहीत, जिकडे लाऊडस्पीकर लावतील तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावा

महत्त्वाच्या बातम्या

माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांना मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांना मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
मुंबईतील अँटिलिया स्फोटकप्रकरणात तब्बल साडे पाच वर्षानंतर सचिन वाझेला जामीन; पण, तुरुंगातून सुटकेची शक्यता कमीच
मुंबईतील अँटिलिया स्फोटकप्रकरणात तब्बल साडे पाच वर्षानंतर सचिन वाझेला जामीन; पण, तुरुंगातून सुटकेची शक्यता कमीच
Raj Thackeray and Sanjay Raut: राज ठाकरे- राहुल गांधींचा पडद्यामागून संवाद? संजय राऊतांच्या स्पष्टीकरणावर राज ठाकरेंनी 'हममम...' केलं अन् सगळेच खो-खो हसत सुटले
राज- राहुल गांधींचा पडद्यामागून संवाद? राऊतांच्या स्पष्टीकरणावर राज ठाकरेंनी 'हममम...' केलं अन् सगळेच खो-खो हसत सुटले
Raj Thackeray: निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंचा मोर्चा कधी आणि कुठून निघणार? सगळ्यांना आमंत्रण पण झेंडा अन् अजेंडा एकच, राज ठाकरे काय-काय म्हणाले?
निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंचा मोर्चा कधी आणि कुठून निघणार? सगळ्यांना आमंत्रण पण झेंडा अन् अजेंडा एकच, राज ठाकरे काय-काय म्हणाले?

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
Gold : दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
Ketan Agrawal and Siya Goyal : वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
India Alliance on SIR Meeting: इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांना मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांना मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
Ketan Agrawal Case : साक्षीदारांना गडावरून फेकण्याची धमकी; एका महिलेलाही धमकावलं; चार्जशीटमधून कोणत्या गोष्टी समोर आल्या, केतनच्या वडिलांनी दिली माहिती
साक्षीदारांना गडावरून फेकण्याची धमकी; एका महिलेलाही धमकावलं; चार्जशीटमधून कोणत्या गोष्टी समोर आल्या, केतनच्या वडिलांनी दिली माहिती
Embed widget