एक्स्प्लोर

मनसेच्या दणक्यानंतर तेजस एक्स्प्रेसचं 'जय महाराष्ट्र', गांधी टोप्या घालून प्रवाशांचं स्वागत

पश्चिम रेल्वे मार्गावर कालपासून (17 जानेवारी) पहिली खासगी तेजस एक्स्प्रेस धावू लागली आहे. मुंबई-अहमदाबाददरम्यान धावणाऱ्या या रेल्वेमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या रेल्वे सुंदरी (Train Hostess) आणि त्यांच्या पोशाखावरून वाद निर्माण झाला होता.

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर कालपासून (17 जानेवारी) पहिली खासगी तेजस एक्स्प्रेस धावू लागली आहे. मुंबई-अहमदाबाददरम्यान धावणाऱ्या या रेल्वेमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या रेल्वे सुंदरी (Train Hostess) आणि त्यांच्या पोशाखावरून वाद निर्माण झाला होता. हा पोशाख केवळ गुजराती काठवाडी पद्धतीचाच असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यास विरोध केला होता. होस्टेसचा पोशाख महाराष्ट्रीय पद्धतीचादेखील असावा अशी मागणी मनसेने केली होती. हा वाद अधिक वाढून नये म्हणून रेल्वेने माघार घेतली आहे.

तेजस एक्स्प्रेस जेव्हा मुंबई सेंट्रल स्थानकात पोहोचली तेव्हा होस्टेसच्या पोशाखात लगेच बदल करण्यात आला. या तरुणींच्या डोक्यावरील काठवाडी टोप्या बदलून त्याठिकाणी गांधी टोपी दिली गेली. ही टोपी महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामुळे हा पोशाखाचा वाद आता मिटण्याची शक्यता आहे.

तेजस एक्सप्रेसमध्ये मराठी संस्कृतीकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेकांनी तेजसला विरोध केला होता. मात्र, मुंबई सेंट्रल येथे तेजस एक्स्प्रेस दाखल झाल्यावर होस्टेसनी गांधी टोप्या परिधान केल्या होत्या, तसेच 'जय महाराष्ट्र'चा घोष करत त्यांनी मुंबई सेंट्रल स्थानकात प्रवाशांचे स्वागत केले.

दिल्ली ते लखनऊ पहिल्या खासगी एक्स्प्रेसनंतर अहमदाबाद ते मुंबई दुसरी खासगी तेजस एक्स्प्रेस शुक्रवारी धावली. ही गाडी अहमदाबादहून सकाळी 10.30 वाजता सुमारास सुटली. त्यानंतर, संध्याकाळी 5 च्या सुमारास मुंबई सेंट्रल स्थानकात पोहोचली.

गरबा, दांडियाचा जल्लोष करून अहमदाबादहून एक्स्प्रेस सुटली. मात्र, मराठी संस्कृती आणि भाषेचा उल्लेख नसल्याने मराठीप्रेमी तेजस एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलवर येऊ देणार नव्हते, पण आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मराठी पेहराव म्हणून होस्टेस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना गांधी टोप्या दिल्या.

तेजसमध्ये गुजरातीसोबत महाराष्ट्रीय पदार्थांची मेजवानी तेजस एक्स्प्रेसमध्ये कोंबडीचा झणझणीत रस्सा, कोकणी पद्धतीचे चिकन, चिकन कोल्हापुरी, श्रीखंड, बटाट्याची भाजी, बटाटा वडा, बाकरवडी, कोथिंबीर वडी, कांदेपोहे अशा अस्सल महाराष्ट्रीय मांसाहारी व शाकाहारी खाद्यपदार्थाची मेजवानी मिळणार आहे.

पहिल्याच दिवशी तेजस एक्स्प्रेसमध्ये छोटा अपघात तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवास सुरु असतानाच एक छोटा अपघात झाला. ट्यूबलाईट वर लावलेले प्लास्टिकचे पॅनल अचानक खाली कोसळले. त्यामुळे कोणाला इजा झाली नाही मात्र ही गाडी जुनी असल्याचे सिद्ध झाले. गाडीवर दिलेल्या माहितीप्रमाणे ही गाडी ऑगस्ट 2018 मध्ये बनवण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत ती तशीच उभी ठेवली होती का? असा प्रश्नही याठिकाणी निर्माण होतो.

मराठीकडे अजूनही दूर्लक्षच तेजस एक्सप्रेसमधील पाट्यांवर इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषेत सूचना लिहिण्यात आल्या आहेत. मात्र त्यामध्ये मराठीचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे मराठीप्रेमी रेल्वे व्यवस्थापनावर नाराज आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates: पाऊस अचानक का थांबला, पुन्हा कधी कोसळणार?; भारतीय हवामान विभागाने सांगितली A टू Z माहिती
पाऊस अचानक का थांबला, पुन्हा कधी कोसळणार?; भारतीय हवामान विभागाने सांगितली A टू Z माहिती
Mumbai Crime News: 'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
लाडकी बहिण योजनेत 14 लाख पुरुषांची नावे घुसवली; भाजप प्रवक्त्यांचा काँग्रेसवर आरोप, महिला संख्या कमी झाल्याने वाद
लाडकी बहिण योजनेत 14 लाख पुरुषांची नावे घुसवली; भाजप प्रवक्त्यांचा काँग्रेसवर आरोप, महिला संख्या कमी झाल्याने वाद
Uddhav Thackeray and Sonam Wangchuk: प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News: 'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट, संभाजीनगरमध्ये ऑईल कंपनीवर धाड; पाम तेलासह 2 कोटी 93 लाखांचे खाद्यतेल जप्त
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट, संभाजीनगरमध्ये ऑईल कंपनीवर धाड; पाम तेलासह 2 कोटी 93 लाखांचे खाद्यतेल जप्त
लाडकी बहिण योजनेत 14 लाख पुरुषांची नावे घुसवली; भाजप प्रवक्त्यांचा काँग्रेसवर आरोप, महिला संख्या कमी झाल्याने वाद
लाडकी बहिण योजनेत 14 लाख पुरुषांची नावे घुसवली; भाजप प्रवक्त्यांचा काँग्रेसवर आरोप, महिला संख्या कमी झाल्याने वाद
Uddhav Thackeray and Sonam Wangchuk: प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
राम मंदिरातील लुटीवर 'सर्वोच्च' प्रहार! सुप्रीम कोर्टाने SIT रिपोर्ट मागितला, यूपी-केंद्र सरकार, ट्रस्टला सद्धा नोटीस धाडली, CCTV सुरक्षित ठेवण्याचे निर्देश
राम मंदिरातील लुटीवर 'सर्वोच्च' प्रहार! सुप्रीम कोर्टाने SIT रिपोर्ट मागितला, यूपी-केंद्र सरकार, ट्रस्टला सद्धा नोटीस धाडली, CCTV सुरक्षित ठेवण्याचे निर्देश
Jejuri Varkari Accident: जेजुरीत वारीतील माऊलींचा अपघात; चालकाला तापाच्या गोळ्यांमुळे ग्लानी आली अन् नियंत्रित ट्रक थेट वारकऱ्यांच्या गर्दीत शिरला, तिघांचा अंत
जेजुरीत वारीतील माऊलींचा अपघात; चालकाला तापाच्या गोळ्यांमुळे ग्लानी आली अन् नियंत्रित ट्रक थेट वारकऱ्यांच्या गर्दीत शिरला, तिघांचा अंत
'एकतर आपण 'विश्वगुरू-विश्वगुरू' असं म्हणणं बंद तरी केलं पाहिजे, नाहीतर मग सगळा मूर्खपणा थांबवला पाहिजे..' अनुराधा पौडवाल का संतापल्या?
'एकतर आपण 'विश्वगुरू-विश्वगुरू' असं म्हणणं बंद तरी केलं पाहिजे, नाहीतर मग सगळा मूर्खपणा थांबवला पाहिजे..' अनुराधा पौडवाल का संतापल्या?
Video: सुसाट स्कॉर्पिओ थेट धावत्या डंपरमध्ये मागून घुसली, पाच जणांचा मृत्यू; बचावासाठी जीवाच्या आकांताने किंकाळ्या, देवदर्शन करून परत येताना काळाचा घाला
Video: सुसाट स्कॉर्पिओ थेट धावत्या डंपरमध्ये मागून घुसली, पाच जणांचा मृत्यू; बचावासाठी जीवाच्या आकांताने किंकाळ्या, देवदर्शन करून परत येताना काळाचा घाला
Embed widget