एक्स्प्लोर

राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू, 20 ते 22 टक्के पगारवाढ मिळणार

राज्यातील सुमारे 1 लाख 7 हजार शाळांमधील सुमारे 5 लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. याशिवाय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याच्या निर्णयाला देखील मंजुरी देण्यात आली.

मुंबई : राज्य सरकारने आचरसंहितेपूर्वी निर्णयांचा धडाका सुरु केला आहे. आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 22 मोठ्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये शिक्षकांच्या आणि प्राध्यपाकांच्या सातवा वेतन आयोगाला मिळालेली मंजुरी हा सर्वात मोठा निर्णय ठरला.

राज्यातील सुमारे 1 लाख 7 हजार शाळांमधील सुमारे 5 लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. याशिवाय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याच्या निर्णयाला देखील मंजुरी देण्यात आली.

प्राथमिक शाळा

मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर राज्यातील 1 लाख 7 हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 20 ते 22 टक्के पगारवाढ मिळणार आहे. प्राथमिक शाळेतील शिक्षकांना सध्या 25 ते 30 हजार पगार आहे. तो सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर 32 ते 37 हजार होणार आहे. तर मुख्याध्यापकांना 50 ते 60 हजार पगार आहे, तो सातवा वेतन आयोगानंतर 65 ते 70 हजार होणार आहे.

माध्यमिक शाळा

माध्यमिक शाळेतील शिक्षकांना सध्या 35 ते 40 हजार पगार आहे. तो सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर 42 ते 47 हजार होणार आहे. तर मुख्याध्यापकांना 70 ते 80 हजार पगार आहे, तो सातवा वेतन आयोगानंतर 84 ते 95 हजार एवढा वाढणार आहे.

प्राध्यापकांनाही सातवा वेतन आयोग लागू

उच्च शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या विविध शिक्षण संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित शैक्षणिक अर्हता लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्यातील अकृषि विद्यापीठे, विधी विद्यापीठे व संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालये, शासकीय महाविद्यालये, विज्ञान संस्था, अनुदानित अभिमत विद्यापीठे (पुणे येथील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठामधील शिक्षक व शिक्षक समकक्ष संवर्गांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित शैक्षणिक पात्रता अर्हता लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सातवा वेतन आयोग लागू केल्यामुळे अकृषि विद्यापीठे व संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सुमारे 26 हजार 741 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. वेतन आयोगातील तरतुदी 1 जानेवारी 2016 पासून लागू केल्याने 31 मार्च 2019 पर्यंत 2584 कोटी 47 लाख एवढा वाढीव खर्च येणार असून त्यामध्ये राज्य शासनाचा 50 टक्के हिस्सा व केंद्र शासनाचा 50 टक्के हिस्सा आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gopichand Padalkar and Jayant Patil: जयंत पाटलांना अशोक खरातने रक्ताने आंघोळ घातली, गोपीचंद पडळकरांचा सनसनाटी आरोप
जयंत पाटलांना अशोक खरातने रक्ताने आंघोळ घातली, गोपीचंद पडळकरांचा सनसनाटी आरोप
Uddhav Thackeray On Eknath Shinde: एकनाथ शिंदेंकडून साहेब असा उल्लेख; उद्धव ठाकरे म्हणाले, काहीजण बोलत होते..., विधान परिषदेतील निरोपावेळी काय घडलं?
एकनाथ शिंदेंकडून साहेब असा उल्लेख; उद्धव ठाकरे म्हणाले, काहीजण बोलत होते..., विधान परिषदेतील निरोपावेळी काय घडलं?
Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी पहिला अधिकारी अडचणीत; उपजिल्हाधिकाऱ्यावर मोठी कारवाई, अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले
अशोक खरात प्रकरणी पहिला अधिकारी अडचणीत; उपजिल्हाधिकाऱ्यावर मोठी कारवाई, अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले
VIDEO : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, पण दुरावा कायम;  निरोप समारंभातील फोटोसेशन चर्चेत
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, पण दुरावा कायम;  निरोप समारंभातील फोटोसेशन चर्चेत

व्हिडीओ

Ashok Kharat | खरातच्या दरबारात कुणाकुणाची हजेरी? Special Report
Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले
Bachchu Kadu On Ashok Kharat :खरातसोबत माझी भेट एक्सीडेंटल, व्हायरल व्हिडीओवर कडू स्पष्टच म्हणाले..
Devendra Fadnavis speech on Ashok Kharat: महिलांच्या योनीत बोट, लघवी पाजली, सभागृहात A टू Z सांगितलं
Ashok Kharat Hearing Nashik : अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, कोर्टाचा मोठा निर्णय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Metro tunnel: वाड्यासाठी बोअरवेल खोदली, थेट मेट्रोच्या बोगद्याला खड्डा पडला; शिवाजीनगर ते स्वारगेट जाणाऱ्या भूमिगत मेट्रोमार्गिकेवरील हादरवणारा प्रकार, काय घडलं?
वाड्यासाठी बोअरवेल खोदली, थेट मेट्रोच्या बोगद्याला खड्डा पडला; शिवाजीनगर ते स्वारगेट जाणाऱ्या भूमिगत मेट्रोमार्गिकेवरील हादरवणारा प्रकार, काय घडलं?
Gold Rate : सोने चांदीच्या दरामध्ये अनपेक्षित ट्रेंड, सोने आणि चांदीच्या दरातील घसणीला ब्रेक,चांदी 12000 हजारांनी महागली, सोनं किती रुपयांवर?
सोने आणि चांदीच्या दरातील घसणीला ब्रेक,चांदी 12000 हजारांनी महागली, सोनं किती रुपयांवर?
Karnataka Policy Regarding Digital Usage: कर्नाटकात लहान मुलांसाठी स्क्रीन टाईम ठरला, 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मसुदा प्रसिद्ध; दोन तास नेट सुद्धा बंद राहणार!
कर्नाटकात लहान मुलांसाठी स्क्रीन टाईम ठरला, 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मसुदा प्रसिद्ध; दोन तास नेट सुद्धा बंद राहणार!
Ashok Kharat Snake: सरकारी वकिलांनी कोर्टात 20 फुटांच्या नागाचा उल्लेख करताच अशोक खरात गांगरला, एकटक बोटाकडे पाहत राहिला अन्....
सरकारी वकिलांनी कोर्टात 20 फुटांच्या नागाचा उल्लेख करताच अशोक खरात गांगरला, एकटक बोटाकडे पाहत राहिला अन्....
Ashok Kharat Case: अशोक खरातने शेतकऱ्यांना आयुष्यातून उठवलं, एकाचा घातपात, तिघांनी आयुष्यच संपवलं?
अशोक खरातने शेतकऱ्यांना आयुष्यातून उठवलं, एकाचा घातपात, तिघांनी आयुष्यच संपवलं?
Sachin Goswami Post On Ashok Kharat Case: 'प्रयत्ने चिंचोकी घासता...', प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाची नराधम अशोक खरातवर फक्त 6 शब्दांची मार्मिक पोस्ट
'प्रयत्ने चिंचोकी घासता...', प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाची नराधम अशोक खरातवर फक्त 6 शब्दांची मार्मिक पोस्ट
Gopichand Padalkar and Jayant Patil: जयंत पाटलांना अशोक खरातने रक्ताने आंघोळ घातली, गोपीचंद पडळकरांचा सनसनाटी आरोप
जयंत पाटलांना अशोक खरातने रक्ताने आंघोळ घातली, गोपीचंद पडळकरांचा सनसनाटी आरोप
Satara ZP Election: सातारा जिल्हा परिषद निवडणूक अपहरण प्रकरणात महत्त्वाची अपडेट, पोलिसांच्या कारभारावर न्यायालयाने ओढले ताशेरे, राष्ट्रवादीच्या सदस्यांचा जामीन मंजूर
सातारा जिल्हा परिषद निवडणूक अपहरण प्रकरणात महत्त्वाची अपडेट, पोलिसांच्या कारभारावर न्यायालयाने ओढले ताशेरे, राष्ट्रवादीच्या सदस्यांचा जामीन मंजूर
Embed widget