एक्स्प्लोर
मस्ती केल्यामुळे विद्यार्थ्याला गरम चाकूने चटके, शिक्षिकेचा प्रताप
मुंबईः शिक्षक दिन दोन दिवसांवर आला असताना मुंबईतील वसईत एका शिक्षेकेने दहा वर्षाच्या विद्यार्थ्याला चक्क गरम चाकूने चटका दिल्याची घटना समोर आली आहे. या शिक्षिकेविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून तिला पोलिसांनी अटक केली आहे.
विरारमधील गोपचर पाडा परिसरातल्या खासगी शाळेत श्वेता सिंह या शिक्षिका आहेत. या शिक्षिकेने आपल्या घरी शिकवणी घेत असताना 10 वर्षांच्या संतोष सिंह या विद्यार्थ्याच्या उजव्या हातावर गरम चाकूचे चटके दिले.
संतोष फक्त आपलं ऐकत नाही, मस्ती करतो या क्षुल्लक कारणावरून या शिक्षिकेनं हे कृत्य केलं. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून शिक्षिकेला अटक केली. शिक्षिकेच्या या कृत्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement