मुंबई: ओला आणि उबर मालकांविरोधात टॅक्सी चालकांनी पुकारलेल्या संपाला हिंसक वळण लागलं आहे. आझाद मैदानावरील आंदोलनात टॅक्सी चालकांनी कायदा हातात घेतला आणि माध्यमांच्या दोन वाहनांची तोडफोड केली आहे.

 

ओला, उबर टॅक्सींविरोधात टॅक्सीचालकांनी आझाद मैदानावर सकाळपासून आंदोलन सुरु केलंय. सुमारे 1 हजार टॅक्सीचालक या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

 

मात्र उबेर आणि ओलाविरोधात संताप व्यक्त करताना टॅक्सी चालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालंय. आंदोलकांनी प्रसार माध्यमांच्या दोन गाड्यांची तोडफोड केलीय. उबर आणि ओलाच्या गाड्या आहेत असं समजून ही तोडफोड करण्यात आली आहे.

 

मुंबईत चालणाऱ्या खासगी टॅक्सींमुळे आपल्या रोजगारावर गदा येत असल्याचं टॅक्सी चालकांनी संप पुकारलाय. अनेक टॅक्सी संघटना या आंदोलनात सहभागी झाल्यात.