नवी मुंबई : वाशी-मानखुर्द रस्त्यावर टँकर पलटी झाल्यामुळे मुंबईच्या दिशेनं येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज सकाळी झालेल्या अपघातानंतर नवी मुंबईकडून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
आज सकाळी नवी मुंबईत मानखुर्दजवळ गॅसचा टँकर पलटी झाला. यानंतर वाशी पुलापासून अपघातस्थळापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबईतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अपघातामुळे झालेली वाहन कोंडी फोडण्यासाठी वाहतूक वळवण्यासाठी पोलिसांना वेळ लागत आहे. घटनास्थळी पोलीस, अग्नीशमन दल आणि क्रेन दाखल झाले आहेत. गॅसचा टँकर सरळ करण्यासाठी प्रयत्न सुरु असून जोपर्यंत हा टँकर हटवला जात नाही, तोपर्यंत वाहतूक धीमीच राहण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईत मानखुर्दजवळ टँकर पलटी, वाहतूक विस्कळीत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Aug 2017 07:50 AM (IST)
वाशी-मानखुर्द रस्त्यावर टँकर पलटी झाल्यामुळे मुंबईच्या दिशेनं येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज सकाळी झालेल्या अपघातानंतर नवी मुंबईकडून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -