शिवसेना विनोद तावडेंविरोधात विधान परिषदेमध्ये हक्कभंग आण्यासाठी आक्रमक झाली. तर विधानसभेत उच्चशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकरांविरोधात काँग्रेस हक्कभंग आणण्याच्या तयारीत आहे.
मुंबई विद्यापीठाच्या निकालासंदर्भात राज्य सरकारने दिलेल्या दुसऱ्या आश्वासनाचाही बोऱ्या वाजणार आहे. कारण विद्यापीठाने दिलेल्या नव्या डेडलाईनला म्हणजेच 5 ऑगस्टलाही निकाल लागणार नसल्याची माहिती स्वतः कुलगुरूंनी दिल्याची माहिती आहे.
युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांची भेट घेतली. यावेळी कुलगुरुंनी नवी डेडलाईनही हुकणार असल्याची माहिती दिल्याचं युवासेनेच्या पदाधाकाऱ्यांनी सांगितलं. उद्या (बुधवारी) संध्याकाळी 5 वाजता कुलगुरु पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देणार असल्याची माहिती आहे.
मुंबई विद्यापीठाचा निकाल 31 जुलैला लागेल, असं आश्वासन विनोद तावडेंनी दिलं होतं. मात्र त्यांचा हा दावा फोल ठरला. युद्धपातळीवर प्रयत्न करुनही मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडलेलेच आहेत. परिणामी शिवसेनेसह विरोधकही आक्रमक झाले आहेत.
संबंधित बातम्या :