एक्स्प्लोर

माझा भाऊ माझ्यापेक्षा दहापटीने इमोशनल : सुप्रिया सुळे

मुंबई : माझ्या भावाला तुम्ही ओळखलंच नाहीत. दादा माझ्यापेक्षा दहापटीने इमोशनल आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्याबद्दल बोलताना सांगितले. सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' कार्यक्रमात वैयक्तिक आणि राजकीय जीवनातील विविध मुद्द्यांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. “मुंबईत राष्ट्रवादीची संघटना बांधणी कमी” मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना बांधण्यास कमी पडलो, अशी कबुली सुप्रिया सुळे यांनी दिली. शिवाय, "बाळासाहेबांनी शिवसेनेची चांगली संघटना बांधली, पण रचनात्मक बांधणी नाही. मात्र, संघटना बांधण्यापेक्षा चांगलं काम काय केलं, हाही प्रश्न आहे.", असे म्हणत सुप्रिया सुळेंनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवाय, त्यांनी शिवसेना, भाजपच्या मुंबईतील कारभारावरही टीका केली. “…म्हणून भाषणात ‘नागिण’ संबोधलं” कुंडल्यांसदर्भातील मुंख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारल्यास, त्या म्हणाल्या, "मुख्यमंत्री कुंडल्या काढणार म्हणाले होते, त्यावेळी भाषणाच्या ओघात नागिन असं संबोधलं. मुख्यमंत्री माझी कुंडली काढणार असतील, तर मी नाही ऐकून घेणार "  “2019 पूर्वीच राज्याची निवडणूक येऊ शकते” "शिवसेना-भाजपच्या भांडणात महाराष्ट्राचं नुकसान झालं. यांचं जनतेकडे लक्ष नाही. राज्य सरकारची निवडणूक 2019 च्या आधीही येऊ शकते. या सरकारने विश्वासार्हता गमावलीय, 2 वर्षांच्या आतच 1 विकेट (खडसे) पडली.", असे म्हणत मध्यवधी निवडणुकांसंदर्भात सुप्रिया सुळेंनी मत मांडलं. "होय, आमच्या घरात घराणेशाही" "होय, आमच्या घरात घराणेशाही आहे. मात्र, आम्ही लोकांमधून निवडून आलोय. घराणेशाहीमुळे तुम्ही एखाद्या वेळी निवडून याल, पण तुम्हाला कर्तृत्व सिद्ध करावं लागतंच", असे सुप्रिया सुळेंनी घराणेशाहीबाबत बोलताना सांगितले. मात्र, माझ्या आणि दादाच्या मुलांनी राजकारणात येऊ नये, अशी आमची इच्छा आहे, असेही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले. काँग्रेससोबत आघाडीशी आमचा नेहमीच प्रयत्न असतो. आम्ही एका ताटात जेवलो आहे, त्यामुळे त्यांच्यावर करणार टीका नाही, असे सुप्रिया सुळे काँग्रेसबद्दल म्हणाल्या. शिवाय, राहुल गांधी अतिशय चांगला सहकारी ही माझी भूमिका आहे, असेही त्यांनी न विसरता सांगितले. खासदार सुप्रिया सुळेंचे ‘माझा कट्टा’वरील महत्त्वाचे मुद्दे :
  • जेंडरमध्ये पद अडकू नये, मुख्यमंत्री पुरुष असावा की स्त्री, त्याने योग्य काम करावं – सुप्रिया सुळे
  • माझ्या आणि दादाच्या मुलांनी राजकारणात येऊ नये, अशी आमची इच्छा आहे – सुप्रिया सुळे
  • घराणेशाहीमुळे तुम्ही एखादेवेळी निवडून याल, पण तुम्हाला कर्तृत्व सिद्ध करावं लागतंच- सुप्रिया सुळे
  • माझा भाऊ माझ्यापेक्षा 10 पट इमोशनल - सुप्रिया सुळे
  • पवार कुटुंबावर टीका केल्याने आमचं काही नुकसान होत नाही - सुप्रिया सुळे
  • आर. आर. पाटील यांची आठवण येते - सुप्रिया सुळे
  • टीव्ही, ट्विटरमुळे सर्व रेकॉर्ड राहतं,मुख्यमंत्र्यांनी दिलेले शब्द पाळावेत - सुप्रिया
  • मुंबईत राष्ट्रवादीची संघटना बांधण्यास कमी पडलो - सुप्रिया सुळे
  • बाळासाहेबांनी चांगली संघटना बांधली, पण रचनात्मक बांधणी नाही - सुप्रिया सुळे
  • महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांमध्ये बाळासाहेबांचा नंबर, ते दिलदार होते - सुप्रिया सुळे
  • शिवसेनेने 25 वर्षात मुंबईत काय काम केलं? लक्षात राहील असं एकही काम दाखवू शकणार नाहीत - सुप्रिया सुळे
  • शिवसेनेचा हेवा वाटत नाही, संघटना बांधण्यापेक्षा चांगलं काम काय केलं, हा प्रश्न आहे - सुप्रिया सुळे
  • आऊट गोईंगची काळजी वाटत नाहीत, प्रत्येक संघटनेत चढ-उतार येतोच - सुप्रिया सुळे
  • 1978 ला पवारसाहेबांनी 50 आमदार निवडून आणले,त्यापैकी 45 जण सोडून गेले, आज त्यांचं अस्तित्व काय?- सुप्रिया सुळे
  • जे पक्ष सोडून गेलेत त्यांना शुभेच्छा, ते का सोडून गेले हे मला माहीत नाही - सुप्रिया सुळे
  • मुख्यमंत्री आधी करप्ट पार्टी म्हणाले, आता कन्फ्युजन म्हणतायेत, मग खरं कन्फ्युज कोण हे दिसतंय - सुप्रिया सुळे
  • माझा भाऊ चुकतोय असं मला वाटत नाही - सुप्रिया सुळे
  • शरद पवारांच्या भाषणांना वैचारीक बैठक, काँग्रेस-राष्ट्रवादीची भाषणं पूर्णत: वेगळी - सुप्रिया सुळे
  • बाळासाहेबांची भाषणाची वेगळी स्टाईल होती, महाराष्ट्राने ती स्वीकारली होती - सुप्रिया सुळे
  • आता मुंबई केंद्रीत प्रश्न झालेत, राज्याच्या प्रश्नांकडे तितकंस लक्ष दिलं जात नाही - सुप्रिया सुळे
  • मुख्यमंत्री कुंडल्या काढणार म्हणाले होते, त्यावेळी भाषणाच्या ओघात नागिन असं संबोधलं- सुप्रिया सुळे
  • सत्ता असो की नसो, लोकप्रतिनीधी म्हणून काम करताना जनतेचं हित महत्त्वाचं - सुप्रिया सुळे
  • स्वाभिमानी संघटनेने रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केलं होतं, आता शेतमालाला भाव नाही मग कुठे आहेत?- सुप्रिया सुळे
  • मुख्यमंत्री विरोधी पक्षात होते तेव्हा एक बोलायचे आणि आता दुसरंच बोलतायेत - सुप्रिया सुळे
  • बाबा बोडके या गुंडाला आम्ही प्रवेश दिला होता, मात्र दीड तासात तो रद्द केला - सुप्रिया सुळे
  • नोटाबंदी, कांद्याला भाव नाही, कापूस-सोयाबीनला दर नाही, हे सरकारचं अपयश- सुप्रिया सुळे
  • अडीच वर्षांनी मी भाजपला विचारतेय, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? - सुप्रिया सुळे ht
  • शिवसेना-भाजपच्या भांडणात महाराष्ट्राचं नुकसान, यांचं जनतेकडे लक्ष नाही - सुप्रिया सुळे
  • राज्य सरकारची निवडणूक 2019च्या आधीही येऊ शकते - सुप्रिया सुळे
  • या सरकारने विश्वासार्हता गमावलीय, 2 वर्षांच्या आतच 1 विकेट (खडसे)पडली - सुप्रिया सुळे
  • या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर पहिली टीका मी केली- सुप्रिया सुळे
  • मुंबई आम्ही संघटना बांधणीसाठी कमी पडलो हे मान्य -सुप्रिया सुळे
  • पारदर्शकता असेल, तर सोमय्यांनी केलेल्या आरोपांची SIT मार्फत चौकशी करणार का -सुप्रिया सुळे
  • राजकारणातली सुसंस्कृतपणा हरवत चाललाय, वैयक्तिक टीकेने पातळी गाठली-सुप्रिया सुळे
  • लाल दिवा लहानपणापासून पाहिलाय, त्याची हाव नाही - सुप्रिया सुळे

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Wildlife Board : महाराष्ट्रात दोन नवी अभयारण्ये आणि 14 संवर्धन राखीव क्षेत्रे; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, 'या' जिल्ह्यांना फायदा
महाराष्ट्रात दोन नवी अभयारण्ये आणि 14 संवर्धन राखीव क्षेत्रे; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, 'या' जिल्ह्यांना फायदा
Maharashtra HSC Exam : राज्यातील 18 हजार 534 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात, UDISE नोंदणीअभावी बारावीचा परीक्षा अर्ज भरता येईना; शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार
राज्यातील 18 हजार 534 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात, UDISE नोंदणीअभावी बारावीचा परीक्षा अर्ज भरता येईना; शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Thane Morcha: प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
Embed widget