एक्स्प्लोर

प्रेतयात्रा काढणं हे विरोधकांचं हीन कृत्य: मुनगंटीवार

मुंबई: शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या विरोधकांनी आज थेट सरकारची प्रतिकात्मक यात्रा काढली. विरोधकांच्या या कृतीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टीका केली. ‘एखाद्या ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकही असं कृत्य करणार नाही अशाप्रकारचं हीन कृत्य विरोधकांनी आज प्रेतयात्रा काढून केले आहे.’ अशा शब्दात सुधीर मुनगंटीवारांनी विरोधकांवर निशाणा साधला. नेमकं काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार? ‘राज्यात सर्व निवडणुकीमध्ये काँग्रेस व राष्टवादीचा पराभव झाल्यानं त्यांची मनस्थिती ठिक नाही. त्यांना आपला पराभव पचवता आलेला नाही. एखाद्या ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकही असं कृत्य करणार नाही अशाप्रकारचं हीन कृत्य विरोधकांनी आज प्रेतयात्रा काढून केले आहे.’ ‘विरोधकांनी त्यांच्या काळात कमिशन मोडवर राज्य चालवलं. परंतु हे सरकार मिशन मोडवर काम करीत आहे. सरकारच्या या कामाला विरोधक खीळ घालण्याचे काम करीत आहेत. यापूर्वी विरोधकांनी भाजप-शिवसेनेमध्येही फूट पाडण्याचा प्रयत्न काल पण त्यात त्यांना यश आलं नाही. त्यांना प्रेतयात्रा काढायाची होती तर, गेल्या १५ वर्षात केलेल्या चुकांची व शेतकर्‍यांवर केलेल्या अन्यायाची प्रेतयात्रा काढायला हवी होती.’ ‘अर्थसंकल्प मंजूर करावयाचा नाही अशी विरोधकांची इच्छा होती. अर्थसंकल्प मंजूर करणे हे भामरागड येथील शेतकरी व कर्मचारी यांच्यासाठी महत्वाचे होते. विरोधकांची संघर्ष यात्रा म्हणजे AC बसमधला प्रवास.’ अशी बोचरी टीका मुनगंटीवार यांनी केली. Government_Funeral_3 विरोधकांकडून सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा विरोधकांनी आज थेट सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. स्टेट बँक ऑफ इंडियाचं कार्यालय ते विधानभवनापर्यंत ही प्रेतयात्रा काढण्यात आली. या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार सहभागी झाले होते. विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणारे विरोधक विधानभवनाच्या बाहेर मात्र चांगलेच आक्रमक झाल्याचं चित्र आहे. यावेळी अजित पवारांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करा. आम्ही परत कर्जमाफी मागणार नाही. आमचे शेतकरी धान्य, फळं, भाजीपाला घेतील, त्याला योग्य बाजारभाव द्या, आधारभूत किंमत द्या, असं अजित पवार म्हणाले. संबंधित बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
Sanjay Raut and Devendra Fadnavis: 'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget