एक्स्प्लोर

प्रधानमंत्री ग्रामसडकचे प्रस्ताव त्वरित सादर करा, देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्राने आपले प्रस्ताव अद्यापही सादर केलेले नाहीत. अन्य राज्यांमध्ये सुमारे 17 हजार किमीच्या कामांना आतापर्यंत मंजुरी प्रदान करण्यात आलेली असताना महाराष्ट्रात मात्र अद्याप साधे प्रस्ताव सुद्धा सादर होऊ नये, हे अतिशय दुर्दैवी आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

मुंबई : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील निधीचा महाराष्ट्राला फायदा मिळावा, ग्रामीण रस्त्यांचे व्यापक जाळे निर्माण व्हावे, यासाठी केंद्र सरकारचा पुढाकार असला तरी अद्याप तसे प्रस्तावच राज्याकडून गेलेले नाही. दुसरीकडे अन्य राज्यांमध्ये सुमारे 17 हजार किमीचे रस्ते मंजूर झालेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने आढावा घेऊन हे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रातून केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. या तिसर्‍या टप्प्यात सुमारे 1.25 लाख किलोमीटरचे रस्ते उभारण्यात येणार आहेत. ग्रामीण बाजार समित्या, शाळा आणि रूग्णालये यांना चांगली कनेक्टिव्हीटी असावी, हा मुख्य उद्देश यात आहे. या तिसर्‍या टप्प्यात महाराष्ट्रासाठी 6550 किमीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी नियोजन आणि अंमलबजावणीच्या दृष्टीने संबंधित अधिकार्‍यांचा प्रशिक्षणाचा टप्पाही पूर्ण करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यापर्यंत यादृष्टीने प्रस्ताव सादर करण्यास राज्य सरकारांना सांगण्यात आले होते. परंतु दुर्दैवाने महाराष्ट्राने आपले प्रस्ताव अद्यापही सादर केलेले नाहीत. अन्य राज्यांमध्ये सुमारे 17 हजार किमीच्या कामांना आतापर्यंत मंजुरी प्रदान करण्यात आलेली असताना महाराष्ट्रात मात्र अद्याप साधे प्रस्ताव सुद्धा सादर होऊ नये, हे अतिशय दुर्दैवी आहे. आज कोरोनाच्या काळात ग्रामीण भागात मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न असल्याने हे प्रस्ताव आधीच सादर झाले असते, तर आज त्या रोजगारसंधी कोरोनाच्या काळात अतिशय महत्त्वपूर्ण राहिल्या असत्या. पण, तसे दुर्दैवाने झालेले नाही. वेळेत प्रस्ताव सादर न करण्यात आल्याने ग्रामीण भाग या रोजगारसंधींना मुकला आहे. केंद्र सरकारमार्फत सातत्याने पाठपुरावा होत असताना सुद्धा राज्य सरकारकडून अतिशय संथगतीने त्यावर कारवाई सुरू आहे. आपल्या पातळीवर याचा आढावा घेऊन त्वरित प्रस्ताव सादर करण्यात यावेत. केंद्र सरकारकडून मदत मिळत असताना, पाठपुरावा असताना त्याला प्रतिसाद न मिळणे, हे राज्याच्या हिताचे नाही. यात लवकर निर्णय झाल्यास यातून रस्त्यांची कामेही होतील आणि ग्रामीण भागातील लोकांच्या हाताला रोजगार सुद्धा मिळेल. त्यामुळे त्वरेने हे प्रस्ताव सादर करण्यात यावेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Matang Morcha: मुंबईत मातंग समाजाचा एल्गार, पोलिसांना काही कळायच्या आत सीएसएमटी परिसर पिवळ्या जनसागराने व्यापला, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
मुंबईत मातंग समाजाचा एल्गार, पोलिसांना काही कळायच्या आत सीएसएमटी परिसर पिवळ्या जनसागराने व्यापला, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
Mumbai Crime News: 'ये इलाका हमारा है...' म्हणत मुंबईत खंडणी उकळणाऱ्या टोळीला पोलिसांचा दणका; कुख्यात 'बडा कन्ना' जेरबंद
'ये इलाका हमारा है...' म्हणत मुंबईत खंडणी उकळणाऱ्या टोळीला पोलिसांचा दणका; कुख्यात 'बडा कन्ना' जेरबंद
Ramesh Kadam: मातंग समाजाच्या निर्धार मोर्चाला जाण्यापूर्वीच रमेश कदम स्थानबद्ध; म्हणाले, 'स्वतंत्र आरक्षणाच्या न्यायासाठी...'
मातंग समाजाच्या निर्धार मोर्चाला जाण्यापूर्वीच रमेश कदम स्थानबद्ध; म्हणाले, 'स्वतंत्र आरक्षणाच्या न्यायासाठी...'
Parashuram Mahamandal : स्व. अजितदादा पवार कर्ज योजनेला मंजुरी, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा मोठा निर्णय
स्व. अजितदादा पवार कर्ज योजनेला मंजुरी, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Neelam Gorhes Pune Bungalow : घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
Video: नेपाळवर अस्मानी संकट सुटता सुटेना, आता महाकाय डोंगर नदीत कोसळला, रस्त्यावर ढिगाऱ्यांवर ढिगारे, परिसरातील पूर आणि भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू; नदीत क्रूझ सुद्धा पलटी
Video: नेपाळवर अस्मानी संकट सुटता सुटेना, आता महाकाय डोंगर नदीत कोसळला, रस्त्यावर ढिगाऱ्यांवर ढिगारे, परिसरातील पूर आणि भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू; नदीत क्रूझ सुद्धा पलटी
Sanjay Raut: ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई, राज आणि राहुल गांधी यांच्यामध्ये संवाद आहे का? संजय राऊतांनी अवघ्या सहा शब्दात सांगितलं अन् भूवया उंचावल्या!
ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई, राज आणि राहुल गांधी यांच्यामध्ये संवाद आहे का? संजय राऊतांनी अवघ्या सहा शब्दात सांगितलं अन् भूवया उंचावल्या!
Sudhir Raut : अपघाताआधी देवगिरी ते एयरपोर्ट प्रवासात सोबत; अजित पवारांनी विलिनीकरणाबाबत ते शब्द उच्चारले अन् पुढच्या तासाभरात विमान पडलं, सुधीर राऊतांनी सांगितली दादांसोबतची शेवटची भेट
अपघाताआधी देवगिरी ते एयरपोर्ट प्रवासात सोबत; अजित पवारांनी विलिनीकरणाबाबत ते शब्द उच्चारले अन् पुढच्या तासाभरात विमान पडलं, सुधीर राऊतांनी सांगितली दादांसोबतची शेवटची भेट
Election Commission: इकडं ठाकरे बंधू आज विराट मोर्चासाठी रणशिंग फुंकणार, तिकडं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून पहिला मोठा निर्णय! थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चार मागण्या
इकडं ठाकरे बंधू आज विराट मोर्चासाठी रणशिंग फुंकणार, तिकडं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून पहिला मोठा निर्णय! थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चार मागण्या
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना एकापाठोपाठ एक झटके, महिलेकडून पोलिसांत तक्रार, थेट शिंदे-फडणवीसांकडेच मदत मागितली
मनोज जरांगेंना एकापाठोपाठ एक झटके, महिलेकडून पोलिसांत तक्रार, थेट शिंदे-फडणवीसांकडेच मदत मागितली
Matang Morcha: मुंबईत मातंग समाजाचा एल्गार, पोलिसांनी काही कळायच्या आत सीएसएमटी परिसर पिवळ्या जनसागराने व्यापला, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
मुंबईत मातंग समाजाचा एल्गार, पोलिसांनी काही कळायच्या आत सीएसएमटी परिसर पिवळ्या जनसागराने व्यापला, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
Chanakya Niti: आयुष्यात कोणत्या प्रसंगी गप्प राहावे? मौनपणा कधी शहाणपणाचा ठरतो? चाणक्यनीती सांगते...
आयुष्यात कोणत्या प्रसंगी गप्प राहावे? मौनपणा कधी शहाणपणाचा ठरतो? चाणक्यनीती सांगते...
Embed widget