मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये अधिकाधिक सुधारणा होणे त्या सोबतच विद्यार्थ्यांना जगातील सर्व तंत्रज्ञानासहित शिक्षण देणे यासारख्या बाबी जागतिकीकरणाच्या काळात आवश्यक आहेत. त्यासाठी खास दिल्ली सरकारच्या दिल्ली निगम अंतर्गत येणाऱ्या शाळांच्या मॉडेलचा अभ्यास करून त्या मॉडेलच्या धर्तीवर राज्य सरकार सुद्धा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठीच तज्ञांचा एक अभ्यास गट गठीत करून हा गट दिल्लीतील सरकारी शाळांचा आढावा घेऊन त्या ठिकाणी संपूर्ण माहिती घेऊन त्याबाबतचा अहवाल राज्य सरकारला देणार आहे.
दिल्ली सरकारच्या दिल्ली निगम अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये काळानुरूप शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी मोठ्या प्रमाणावर बदल व सुधारणा झालेले आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान, विद्यार्थ्यांकरिता व शिक्षकांकरिता असलेल्या सुविधा, विद्यार्थ्यांच्या आचार-विचार व शिस्त तसेच शिक्षकांना शिकवण्याची कार्यपद्धती या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करण्याकरिता तज्ज्ञ मंडळींचा अभ्यास गट गठित केला आहे. या अभ्यास गटाला दिल्ली येथे पाठवण्याचे विचाराधीन होते. दिल्ली सरकारच्या शाळांमध्ये कशा प्रकारे शिक्षण दिले जाते. या कार्यपद्धतीचा सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करण्याकरिता तज्ञ मंडळींचा अभ्यास गट राज्य सरकारकडून गठीत करण्यात आला आहे.
यामध्ये औरंगाबादचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बी बी चव्हाण, सेवानिवृत्त विशेष लेखा परीक्षक आर एस शेख, सोबतच गट शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक या मंडळींचा हा अभ्यासगट गठीत करण्यात आला आहे. या अभ्यास गटाने दिल्ली सरकारच्या दिल्ली निगम अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणे, शिकवण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान ,सुविधा, शिकवण्याची कार्यपद्धती या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करायचा आहे व हा अहवाल ग्रामविकास मंत्र्यांकडे सादर करायचा आहे.
संबंधित बातम्या
- School : विद्यार्थ्यांना कायम घरी ठेवल्याने मानसिक धोका, राज्यातील बालकांच्या टास्क फोर्सचा इशारा
- Be Positive : सुंदर शाळेचा Solapur पॅटर्न, लोकसहभागातून 3 कोटींचा निधी