एक्स्प्लोर

Eleventh Admission : अद्याप अकरावी प्रवेश न मिळलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळणार

अकरावी प्रवेशासाठी येत्या 28 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' (FCFS) तत्त्वावर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे

मुंबई : इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी चालून आली आहे. येत्या 28 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' (FCFS) तत्त्वावर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. अकरावी प्रवेशासाठी कॉलेजमध्ये पुरेशा जागा उपलब्ध असून कुठलाही इच्छुक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही. सद्यस्थितीत प्रवेश प्रक्रियेच्या चार फेऱ्यांअंती सुमारे 3 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. मात्र, अजूनही काही विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये कॉलेज मिळाले नसल्याने अशा विद्यार्थ्यांसाठी ही विशेष प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या फेरीमध्ये कोणते विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असतील? 

प्रवेश अर्जाचा भाग-1 भरलेले आणि अद्याप कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित न केलेले विद्यार्थी या फेरीसाठी पात्र असतील.  ज्या विद्यार्थ्यांनी आधी मिळालेले कॉलेज मधील प्रवेश रद्द केले आहे किंवा प्रवेश नाकारला आहे असे विद्यार्थी या फेरीमध्ये सहभागी होऊ शकतील. राज्य मंडळाच्या दहावी परीक्षेत एटीकेटीची सुविधा मिळालेले विद्यार्थी सुद्धा या फेरीसाठी पात्र असतील.

या फेरीसाठी विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांनुसार त्यांचे सात गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे  यामध्ये,

  • 90 टक्के आणि 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी 
  • 80 टक्के ते 80 टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी
  • 70 टक्के ते 70 टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी
  • 60 टक्के ते 80 टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी
  • 50 टक्के ते 50 टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी
  • दहावी उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी 
  • दहावी परीक्षेत एटीकेटी सुविधा मिळालेले विद्यार्थी

28 सप्टेंबर पासून विद्यार्थ्यांना गटानुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन सद्यस्थितीत रिक्त जागांवर आपली प्रवेश निश्चित करायचे आहेत. विद्यार्थी वरील पैकी गुणांनुसार कोणत्या गटांमध्ये येतो? हे बघून त्यानुसार संकेत स्थळावरील वेळापत्रक पाहून कॉलेजमध्ये निश्चित करायचे आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai High Court On Tukaram Mundhe FDA: हे योग्य नाही...मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह; नेमकं काय काय म्हटलं?
हे योग्य नाही...मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह; नेमकं काय काय म्हटलं?
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
Embed widget