मुंबई : जेईई (JEE) आणि नीट (NEET) परीक्षा होणार हे निश्चित झाल्यानंतर विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर कसे पोहोचणार हा प्रश्न होता, ही बाब लक्षात घेत जेईई, नीट परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे.
परीक्षेसाठी असणारे अॅडमिट कार्ड पाहून रेल्वे स्टेशनमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने याबाबतचं परिपत्रक जारी केलं आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि सुरक्षेचे सर्व नियम पाळून या विद्यार्थ्यांना प्रवास करण्याची मुभा दिली जाणार आहे.
कोरोना संकटात जेईईची परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर व नीटची परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. मात्र, देशातील कोरोना संसर्गाची परिस्थिती या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष करत आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात काँग्रेसने संपूर्ण देशात सोशल मीडियावर आंदोलनं देखील केलं.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नीट आणि जेईईच्या परीक्षांना दोनदा स्थगिती देण्यात आली आहे. आधी या परीक्षा मे महिन्यात नियोजित होत्या. त्यानंतर ही परीक्षा जुलै महिन्यात पार पडणार होती. मात्र कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्याने जुलै महिन्यातली परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. आता जेईई मेन परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर रोजी आणि नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे.
संबंधित बातम्या
- JEE NEET Exam Center List: जेईई-नीट परीक्षांसाठी सेंटर्स वाढवले, राज्यनिहाय सेंटर्सची घोषणा
- कोरोनामुळे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकला, सोनू सूदची मागणी
- NEET JEE 2020 | मोठा निर्णय... 'नीट, जेईई परीक्षा वेळेतच', परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली