डोंबिवलीत सेल्फी काढताना विद्यार्थी खाडीत पडला
दहावीत शिकणाऱ्या अभिनव याची आज ट्युशन क्लासमध्ये परीक्षा होती. मात्र परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्यानं अभिनव त्याच्या दोन मित्रांसह दिवा-वसई रेल्वेमार्गाजवळील सात पूल या खाडीवरील पुलावर फिरायला गेला.

कल्याण : सेल्फी काढताना 15 वर्षीय विद्यार्थी खाडीत पडल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. अभिनव झा असं या मुलाचं नाव असून तो डोंबिवली पश्चिम येथील रहिवाशी आहे.
दहावीत शिकणाऱ्या अभिनव याची आज ट्युशन क्लासमध्ये परीक्षा होती. मात्र परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्यानं अभिनव त्याच्या दोन मित्रांसह दिवा-वसई रेल्वेमार्गाजवळील सात पूल या खाडीवरील पुलावर फिरायला गेला. मात्र तिथे सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात असताना त्याचा तोल जाऊन तो खाडीत पडला आणि बुडाला.
यामुळे भेदरलेल्या त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या दोन मित्रांनी त्याच्या घरी येऊन याबाबत माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेड स्थानिकांच्या मदतीनं खाडीत शोधकार्य सुरु करण्यात आलं, मात्र अभिनव अजूनही सापडलेला नाही.
रात्रीच्या अंधार असल्यानं शोधकार्य थांबवण्यात आलं असून उद्या पुन्हा त्याचा शोध घेतला जाणार आहे. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी अभिनव सेल्फी काढताना खाडीत पडल्याचा दावा केला असला, तरी त्याच्याकडे मोबाईलच नसल्याची माहिती त्याच्या घरच्यांनी दिली आहे. त्यामुळे नेमका तो पाण्यात पडला कसा? याबाबत संभ्रमाचं वातावरण आहे.
Before You Go
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर






















