मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई क्राईम ब्रान्चसमोर नवनवीन खुलासे येत आहेत. याच तपासादरम्यान क्राईम ब्रान्चने एका 19 वर्षीय अभिनेत्रीचा जबाब नोंदवला आहे. या जबाबात अभिनेत्रीने पॉर्न शूट कसं केलं गेलं आणि हॉटहिट नावाच्या अॅपवर "इनव्हाईट अनकट" नावाने प्रसारित केले गेले, याची माहिती सांगितली.
क्राईम ब्रान्चच्या सूत्रांच्या माहितीनुसार, 19 वर्षीय अभिनेत्रीने तिच्या जबाबात सांगितलं की, तिने दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. तिच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तिने वडिलांना आर्थिक हातभार लावण्यास सुरुवात केली होती. 2 वर्षांपूर्वी एका मित्राच्या मदतीने ती आकाशवाणी मालाड येथे ऑडियन्स शूटसाठी गेली होती. त्यानंतर तिला मराठी मालिकेत जे काम मिळेल ते ती करायची आणि तिचं घरं चालवायची. पीडितेने पोलिसांना सांगितले की तिचे सर्व काम लॉकडाऊनमध्ये थांबले होते. त्यामुळे तिला कामाची नितांत गरज होती. त्यानंतर तिला अचानक फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर एक जाहिरात दिसली. ज्यामध्ये “acting assignment for good acting web series” म्हणजे वेब सीरिजमध्ये कामाची संधी असं लिहिलं होतं.
त्यानंतर तिने नरेश नावाच्या व्यक्तीच्या फोन नंबरवर फोन केला आणि त्याबद्दल विचारणा केली. त्याने तिला सांगितले की तो एक शॉर्ट फिल्म बनवत आहे, ज्यासाठी त्याला पुरुष आणि स्त्रीची गरज आहे. त्यानंतर नरेशने तिच्याकडे फोटो मागितले. जो पीडित अभिनेत्रीने त्याला व्हॉट्सअॅपवर पाठवला आणि मग त्याने सांगितले की, शॉर्ट फिल्मसाठी 10 हजार मिळतील. यानंतर तिला 10 जानेवारी 2021 रोजी सकाळी 8 वाजता ग्रीन पार्क बंगल्यावर या शॉर्ट फिल्मच्या शूटिंगसाठी येण्यास सांगण्यात आले. जेथे तिची भेट मिडीएटर अजित, दिग्दर्शक निर्माता गेहना वशिस्ट, मेकअप दादा उमेश, आकाश नावाचा अभिनेता आणि 3 कलाकारांसोबत झाली.
गेहनाने पीडित अभिनेत्रीला सांगितले की ते 'स्नोव्हाईट' नावाची एक शॉर्ट फिल्म बनवत आहे. त्यासाठी तिला काही बोल्ड सीन द्यावे लागतील. आकाश त्या चित्रपटात मुख्य अभिनेता असेल आणि काही साईड अॅक्टर आणि हेअर ड्रेसरही एक भूमिका साकारेल. त्यानंतर 10:30 ते 11:30 पर्यंत मेकअप झाला आणि शूटिंग सुरु झाले. त्यानंतर शूटिंग दरम्यान पीडित अभिनेत्रीला पॉर्न शूट करण्यास भाग पाडले गेले आणि ते स्नोव्हाईट नावाने न्यूफ्लिक्सवर प्रसारित केले गेले.