एक्स्प्लोर
Advertisement
राज्यात दोन वर्षांनी मंत्री परिषदेच्या बैठकीचं आयोजन
राज्यमंत्री कॅबिनेट बैठकीला हजर राहू शकत नाहीत. त्यामुळे राज्यमंत्र्यांचा सहभाग आसलेली मंत्री परिषदेची बैठक राज्यात होते.
मुंबई : राज्यात दोन वर्षांनी आज मंत्री परिषदेची बैठक होणार आहे. मंत्रीमंडळ बैठकीला केवळ कॅबिनेट मंत्री हजर असतात. राज्यमंत्री कॅबिनेट बैठकीला हजर राहू शकत नाहीत. त्यामुळे राज्यमंत्र्यांचा सहभाग आसलेली मंत्री परिषदेची बैठक राज्यात होते.
दर महिन्याला चौथ्या मंगळवारी मंत्री परिषद बैठक घेण्याचा निर्णय आघाडी सरकारच्या काळात झाला होता. भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून आतापर्यंत केवळ तीन मंत्री परिषदेच्या बैठका झाल्या आहेत. सरकारला चार वर्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता मंत्री परिषद बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
निवडणूक तोंडावर असताना राज्यमंत्र्यांना सन्मान देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातोय. मंत्री परिषद बैठक घेऊन राज्यमंत्र्यांना खूश करण्याचा हा प्रयत्न असल्याचं हे बोललं जात आहे.
दरम्यान, घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचंही काही दिवसांपूर्वीच समोर आलं होतं. त्यादृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व खात्यांचा आढावाही घेतला आहे. त्यामुळे आता या राज्य मंत्री परिषदेच्या बैठकीत काय होतं, त्याकडे लक्ष लागलं आहे.
संबंधित बातमी :
बाजारात तुरी... मंत्रिमंडळ विस्ताराच्या घोषणेपूर्वीच शिवसेनेत वाद
युती न झाल्यास शिवसेनेला जास्त फटका बसेल: मुख्यमंत्री
'ब्राह्मण मुख्यमंत्री पंचांग बघून मंत्रिमंडळ विस्तार करतील'
10 ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता, खडसेंचं कमबॅक गुलदस्त्यात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement