मुंबई : स्लॅब कोसळून गंभीर जखमी झालेल्या मुंबईतील पोलीस पत्नी वंदना कदम यांची गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी फोनवरुन विचारपूस केली. पन्हा अशा घटना टाळण्यासाठी पोलीस वसाहतीची तातडीने डागडुजी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
यापुढे अशा घटना घडल्यास तातडीने संबिधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असही रणजित पाटील यांनी सांगितलं.
वरळी पोलीस वसाहत क्रमांक 28 मधील वंदन कदम यांच्यावर स्लॅब कोसळून त्या जखमी झाल्या होत्या. या घटनेनंतर त्यांना तातडीने पोदार रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
या उपचारादरम्यान त्यांच्या पायाला नऊ टाके पडले आहेत. पोलीस एकीकडे शहरांची सुरक्षा करत असताना पोलीस कुटुंबीयच किती असुरक्षित आहेत हे पुन्हा एकदा दिसून आलं.
गृहराज्यमंत्री रणजित पाटलांकडून जखमी पोलीस पत्नीची विचारपूस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jun 2018 09:44 PM (IST)
रणजित पाटील यांनी स्वतः फोन करून जखमींची चौकशी केली आणि अशा घटना वारंवार होऊ नये यासाठी तातडीने डागडुजी करण्याचे आदेश दिले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -