मुंबई : काँग्रेस आजही आणीबाणीच्या मानसिकतेत आहे. आणीबाणी आणि न्यायमूर्तींविरोधात महाभियोग ही एकच मानसिकता आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीला आज 43 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी खास आज दिल्लीहून मुंबईला आले आहेत. आणीबाणीविरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बिर्ला मातोश्री सभागृहात भाजपच्या वतीनं कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी नरेंद्र मोदी बोलत होते.
व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.
काँग्रेस आजही आणीबाणीच्या मानसिकतेत : पंतप्रधान मोदी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jun 2018 05:48 PM (IST)
काँग्रेस आजही आणीबाणीच्या मानसिकतेत आहे. आणीबाणी आणि न्यायमूर्तींविरोधात महाभियोग ही एकच मानसिकता आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -