मुंबई : राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी आता कडक कारवाईला सुरुवात केली आहे. कारवाईदरम्यान महापालिका अधिकारी आणि नागरिकांमध्ये वाद होतानाही पाहायला मिळत आहेत.


लोअर परेल येथील ‘हाय स्ट्रिट फिनिक्स मॉल’मध्ये अधिकाऱ्यांनी कारवाई केली. या कारवाईत तृप्ती स्वीट्सच्या दुकानदाराला 5 हजारांचा दंड ठोठावला.

तृप्ती स्वीट्सच्या दुकानात पाणीपुरी हँडग्लोज घालून विकली जात होती. हे हँडग्लोज प्लास्टिकचे असल्याने यावर कारवाई करत पालिकेने दुकानदाराला 5 हजारांचा दंड ठोठावला. हँडग्लोज घालूनच पदार्थ देण्याची ग्राहकांची आग्रही मागणी असल्याचे दुकानदाराने सांगितले. परंतु याला कुठलाही पर्यायी मार्ग नसल्याने  पाणीपुरी हँडग्लोज घालून विकली जाते.

पावसाळ्यात नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून नेहमीच दिला जातो. पण जर हँडग्लोजवरच कारवाई झाल्यास नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रश्नतचिन्ह उभे राहिले आहे. मात्र पाणीपुरी विक्रेत्यांना यासाठी दुसऱ्या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

लोअर परेलच्या फिनीक्स मॉलमध्ये महापालिकेने केलेल्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणावर बंदी असलेले प्लास्टिक जप्त करण्यात आले.