मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या 36 नेत्यांनी 30 डिसेंबरला मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर तातडीने खातेवाटप होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र पाच दिवस उलटूनही खातेवाटपाचा तिढा सुटत नव्हता. काँग्रेसमुळे खातेवाटप होत नसल्याची चर्चा होती. खातेवाटपाचा तिढा सुटला असून काँग्रेसची खातेवाटपाची यादीही तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
काँग्रेसकडून कुणाला कोणतं मंत्रिपद मिळणार याची यादीची एबीपी माझाच्या हाती लागली आहे. खातेवाटपाला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे आज मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर होण्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. परिवहन किंवा कृषी खातं मिळावं यासाठी शिवसेना आग्रही होती. मात्र शिवसेना दोन्ही खाती सोडण्यास तयार नव्हती. अखेर काँग्रेसने एक पाऊल मागे घेतलं आहे. वाटाघाटीत काँग्रेसला बंदरे, खार जमिनी आणि सांस्कृतिक अशी तीन खाती देण्यात आली आहेत. तर राष्ट्रवादीला माजी सैनिक कल्याण, क्रीडा व युवक कल्याण अशी दोन अतिरिक्त खाती देण्यात आली आहेत. तर कृषी आणि परिवहन खाते हे शिवसेनेकडे राहणार आहे.
शिवसेनेच्या वाट्याला नगरविकास, परिवहन, उद्योग, कृषी अशी महत्त्वाची खाती आली आहेत. तर काँग्रेसच्या वाट्याला महसूल, शालेय शिक्षण, उर्जा, सार्वजनिक बांधकाम ही खाती आली आहेत. राष्ट्रवादीच्या वाट्याला गृह, जलसंपदा, अर्थ अशी महत्त्वाची खाती आली आहेत.
काँग्रेसची खातेवाटपाची अंतिम यादी
बाळासाहेब थोरात - महसूल
अशोक चव्हाण- पीडब्यूडी
नितीन राऊत- उर्जा
अस्लम शेख- बंदरे, मत्यउद्योग, वस्त्रोद्योग
वर्षा गायकवाड- शालेय शिक्षण
के. सी. पाडवी- आदिवासी विकास
अमित देशमुख- वैद्यकिय शिक्षण
विजय वडेट्टीवार- दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन
यशोमती ठाकूर- महिला बालकल्याण विकास
संबंधित बातम्या
- खातेवाटपाचा तिढा सुटला, मुख्यमंत्री उद्या निर्णय घेतील, महाविकास आघाडीच्या नेत्यांचा दावा
- Majha Vishesh | आणखी किती घोळ घालणार? | माझा विशेष | ABP MAJHA
- महसूल आणि कृषी खातं मिळवण्यासाठी अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरातांमध्ये रस्सीखेच
- मंत्रालयातील नकोसं दालन; यात बसणाऱ्या मंत्र्यांच्या पदरी कायम निराशाच
- Ministry Distribution | उद्धव ठाकरे सरकारचा खातेवाटपाचा घोळ मिटेचिना...| ABP Majha